<div class="paragraphs"><p>Radhakrishna Vikhe Patil</p></div>

Radhakrishna Vikhe Patil

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे पाटलांनाही कोरोनाची लागण

Amit Awari

अहमदनगर : राज्यातील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत नुकतेच झाले. या अधिवेशनात दोन मंत्री, 53 अधिकारी व काही आमदार कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले. यात राज्यातील माजी मंत्री तथा भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांचाही समावेश आहे. त्यामुळेच ते काल ( ता. 29 ) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळा व आज ( ता. 30 ) विळदघाटातील विखे फाउंडेशनच्या एका कार्यक्रमाला अनुपस्थित होते. Radhakrishna Vikhe Patil also contracted corona

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज सकाळी आला. त्यामुळे ते विळद घाट येथील कार्यक्रमात सहभागी झाले नाही. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून या बाबत कल्पना दिली. तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही विळद घाट येथील कार्यक्रमात याबाबत माहिती दिली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईत विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. या अधिवेशनात अनेक जण कोरोना बाधित आढळून येत असल्याने त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. त्यानुसार आज सकाळी कोरोना चाचणीचा अहवाल आला. यात ते बाधित आढळून आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: आयसोलेट करून औषधोपचार सुरू केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT