Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sarathi Yojana: सारथी योजनांबाबत सरकारचा मोठा निर्णय; राधाकृष्ण विखे पाटलांचे पुण्यात बैठकीदरम्यान महत्वाचे आदेश

Sarathi Yojana Government Decision: सारथी संस्था मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व युवकांना शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मदत करणारी संस्था आहे.

Sudesh Mitkar

  1. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारथी योजनांबाबत महत्वाचे आदेश दिले आहेत.

  2. या आदेशांमुळे हजारो विद्यार्थ्यांना आणि युवकांना थेट लाभ होणार आहे.

  3. महाराष्ट्र सरकार सारथी योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि गती आणणार आहे.

Sarathi Yojana Benefits and Updates: राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुण्यात सारथी संस्थेला भेट देऊन बैठक घेत योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी संस्थेच्या विविध योजनांची सद्यस्थिती, अर्जदारांचा प्रतिसाद, ग्रामीण-शहरी भागातील गरजांनुसार आवश्यक बदल व नव्या उपक्रमांचा आराखडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी ग्रामीण भागातील समाजाच्या प्रत्येक गटांपर्यंत योजनांचा विस्तार करणे, युवकांना रोजगाराभिमुख योजना उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करणे यावर विशेष भर देण्यासाठी योजनांचे उपायोजना करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

बैठकीपूर्वी आणि बैठकीदरम्यान विविध शिष्टमंडळांनी मंत्र्यांची भेट घेऊन आपली निवेदनं सादर केली. या निवेदनांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व युवकांना अधिक प्रमाणात शिष्यवृत्ती, मार्गदर्शन केंद्रे, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगार संधी मिळाव्यात, अशा मागण्या पुढे आल्या. मंत्री विखे पाटील यांनी प्रत्येक शिष्टमंडळाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या प्रगतीसाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना अधिकाधिक शैक्षणिक व व्यावसायिक संधी मिळायला हव्यात.

रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी मदत, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि आधुनिक कौशल्य विकास यावर संस्थेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.” पुढील काळात ग्रामीण भागात संस्थेच्या शाखा किंवा समन्वय केंद्रे सुरू करण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

FAQs :

प्र.1: सारथी योजना काय आहे?
उ.1: सारथी योजना ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व युवकांना शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मदत करणारी योजना आहे.

प्र.2: राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणते आदेश दिले?
उ.2: त्यांनी सारथी योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्र.3: या आदेशांचा कोणाला फायदा होणार आहे?
उ.3: शैक्षणिक मदत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व तरुणांना थेट फायदा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT