Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

राधाकृष्ण विखेंनी अशोक चव्हाणांचे केले भाजपत स्वागत : नाना पटोलेंना दिल्या कानपिचक्या

सरकारनामा ब्युरो

Radhakrishna Vikhe Patil : विधान भवनासमोरील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना राज्यातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्याच्या चर्चेवर प्रश्न विचारला त्यावर त्यांनी चव्हाण यांचे स्वागत असल्याचे सांगितले. त्याच वेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यावर टीका केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण व माझा काही संपर्क नाही. सध्या काँग्रेसचे कोणीही माझ्या संपर्कात नाही. मात्र काँग्रेस पक्षात अस्वस्थता असल्याच्या बातम्या मला मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, भाजप हा काही खूप वेगळा पक्ष नाही. हा जनाधार असलेला पक्ष आहे. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. एवढी मोठी माऩ्यता जनतेने दिली आहे. मोदींचे जगात मान्य आहे. त्यामुळे मोदींचे नेतृत्त्व स्वीकारायला काही हरकत नाही. काँग्रेसकडे नेतृत्त्व नाही. दिशा नाही. काँग्रेसची दशा झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पक्षात कोणाला घ्याचे. कोणाचा प्रवेश घडवायला हा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील. मात्र काँग्रेस सोडून लोक भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. नाना पटोलेंकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे तेच जुने आरोप ते करतात. नाना पटोले हे माझे मित्र आहेत. ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले, त्यावेळी त्यांना कोणाचा फोन होता? देशभरात काँग्रेसची जी दुरवस्था झाली आहे ती कशामुळे झाली याचे आत्मचिंतन व्हायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT