Radhanagari Assembly Constituency election 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापूर उत्तर वेटिंग वरच, शिवसेनेकडून राधानगरीतून आबिटकर आणि करवीरमधून नरके

Radhanagari Assembly Constituency election 2024:राधानगरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार प्रकाश आबिटकर यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. 2014 आणि 2019 चे सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगळवारी रात्री उशिरा पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत 45 जणांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील दहापैकी तीन मतदारसंघ शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. राधानगरी आमदार प्रकाश आबिटकर आणि करवीर मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात अद्याप कोणता निर्णय न घेतल्याने हा मतदारसंघ कोणाकडे राहणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

आचारसंहितापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर राधानगरीतून अबिटकर यांची उमेदवारी घोषित केली होती. मात्र त्याच दिवशी कोल्हापूरच्या मेळाव्यात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजश्री सागर यांची उमेदवारी घोषित करतील अशी शक्यता होती. रात्री या मेळाव्यात त्यांनी उमेदवाराची घोषणा टाळली होती. दरम्यान पहिल्या यादीत कोल्हापूर उत्तरच्या जागेवर उमेदवाराचा निर्णय न झाल्याने महायुतीमध्ये रस्सीखेच असल्याचं समोर आले आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार प्रकाश आबिटकर यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. 2014 आणि 2019 चे सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदा त्यांना हॅट्रिक करण्याची संधी आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीतील संभाव्य उमेदवार ए वाय पाटील किंवा के पी पाटील यांच्याशी होणार आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना शिवसेनेतून तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. 2014 ला ते शिवसेनेकडून दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या विरोधात निवडून आले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी नरके यांचा पराभव केला होता. दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार पीएन पाटील यांचे निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव राहुल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यांच्या विरोधात नरके यांची लढत होणार आहे.

उत्तर बाबत काय निर्णय होणार?

कोल्हापूर उत्तर बाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारावरच महायुतीचे गणित अवलंबून आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा करण्यात येत आहे. शिवाय भाजपकडून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्याकडून उमेदवारीसाठी गाठीभेटी सुरू आहेत. अशातच पहिल्या यादीत नाव न आल्याने या मतदारसंघात कोणाला संधी मिळणार? याबाबत देखील तर्क वितर्क लावले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT