A Y Patil and KP Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhanagari Assembly Election 2024: महाविकास आघाडीतील इच्छुकांची मुंबईकडे धाव; राधानगरीचा उमेदवार कोण? सस्पेन्स कायम

Radhanagari Constituency Updates: गेल्या दोन दिवसातील घडामोडी पाहता एकंदरीतच राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. मात्र कोणत्या नावावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्का मारला आहे. हा सस्पेन्स कायम आहे.

Rahul Gadkar

Radhanagari Election 2024: राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. महायुतीतून महाविकास आघाडीकडे वळालेल्या माजी आमदार के पी पाटील किंवा ए वाय पाटील यांच्या गळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हालचालींना वेग आला आहे. ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणाच्या नावाला पसंती देणार? याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच घडणाऱ्या घडामोडीमुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक अस्वस्थ झाले असून त्यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार के पी पाटील यांना उमेदवारी मिळेल, असा दावा स्वतःचे पी पाटील यांच्याकडूनच केला जात आहे. दुसरीकडे ए वाय पाटील हेच राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा छाती ठोकपणे दावा स्वतः ए वाय पाटील करत आहेत.

निष्ठावंत शिवसैनिकालाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संधी देतील, असा दावा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसातील घडामोडी पाहता एकंदरीतच राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. मात्र कोणत्या नावावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्का मारला आहे. हा सस्पेन्स कायम आहे.

ए वाय पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं ठिकठिकाणी जाहीर केले आहे. त्यामुळे इतर इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. माजी आमदार के पी पाटील यांनी देखील आता मुंबईकडे धाव घेतली आहे. कार्यकर्त्यांकडून यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत. दरम्यान के पी पाटील यांनी सकाळी सकाळीच मुंबई गाठली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी माजी आमदार के पी पाटील यांनी आज सकाळीच मुंबई घातली आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ए वाय पाटील हे आज सकाळी मतदारसंघातच प्रचारात व्यस्त असल्याची माहिती दिली आहे. प्रकाश पाटील ही कोल्हापुरात असल्याची माहिती दिली आहे. मात्र के पी पाटील यांनी मुंबई घातल्यानंतर मतदारसंघात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, ए वाय पाटील यांनी आज देखील आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा 'सरकारनामाशी बोलताना सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT