Mamtabai Bhangre
Mamtabai Bhangre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राहिबाई पोपेरेंच्या शिष्येलाही मिळाला भारत सरकारचा पुरस्कार

शांताराम काळे

अहमदनगर : भारत सरकारने अकोले तालुक्यातील राहिबाई पोपेरे यांना त्यांच्या देशी बियाणे संग्रहाच्या कामासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविले. राहिबाई यांच्या शिष्य असलेल्या अकोले तालुक्यातील ममताबाई भांगरे यांनाही आता देशी बियाणे संग्रहाच्या कामासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. Rahibai Popere's disciple also received a National Award from the Government of India

कृषी मंत्रालय भारत सरकार संचलित प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी (PPV& FRA ) मार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी व्यक्तिगत पातळीवर दिला जाणारा प्लांट जीनोम सेव्हीयर फार्मर रिवॉर्ड (2017-18 ) हा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा मानाचा पुरस्कार तालुक्यातील अन्नमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई देवराम भांगरे यांना मिळाला आहे.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात भारताचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीड लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्यातील कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, तसेच संस्थेचे सदस्य बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे, बायफ संस्थेचे विषय तज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळे, जैव विविधता तज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, योगेश नवले आदी यावेळी उपस्थित होते.

मागील 20 हून अधिक वर्ष ममताबाई यांनी स्थानिक बियाणे संवर्धन आणि वृद्ध यासाठी भरीव कार्य केलेले आहे. याची देशपातळीवर योग्य दखल घेतली गेली. त्यांनी भात पिकाच्या विविध वाहनांचे संरक्षण केलेले आहे तसेच लाल रंगाचा लसूण लांब व आरोग्यास पोषक असलेले दुधीभोपळा, डांगर भोपळा, मोहरी, भुईमूग, मका, तसेच विविध प्रकारचे परसबागेत लागवड योग्य भाजीपाला पिके, तेलबिया, डाळवर्गीय पिके यांच्या पारंपरिक वाणांचे संवर्धन केले आहे.

जनरल मिल्स पुरस्कृत आदिवासी विकास कार्यक्रमातून त्या 2012 साली बायफ या संस्थेशी जोडल्या गेल्या. स्थानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमांतून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी महामंडळ नाशिक यांचे आर्थिक सहकार्याने हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सध्या तालुक्यात राबवला जात आहे.

अकोले तालुक्यात बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थे संस्थेच्या त्या सक्रिय सदस्या आहेत.

त्यांनी सेंद्रिय शेतीचे व परसबागेत भरीव काम उभे केले आहे. येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पारंपरिक वाणांचे संवर्धन त्यांनी केलेले आहे. सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करताना त्यांनी गांडूळ खतापासून बनवलेल्या गोळ्या व गांडूळ खत वापरून बनवलेले सीडबॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले आहे. त्यांचा हा प्रयोग देशभर गाजला.

कलकत्ता येथे झालेल्या 2019 मधील इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्ये त्यांना भारत सरकारकडून सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते. सेंद्रिय शेतीचे पारंपारिक ज्ञान व त्याचा शेतीसाठी वापर यावर त्यांनी सुंदर मॉडेल उभे केले आहे. ते पाहण्यासाठी हजारो शेतकरी आत्तापर्यंत त्यांच्या शेताला भेट देऊन गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT