Radhanagari Assembly Constituency 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: घाटगेंनंतर भाजपचा आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला?

Radhanagari Assembly Constituency 2024 Rahul Desai met Sharad Pawar: राधानगरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे के पी पाटील, ए वाय पाटील यांच्यानंतर आता राहुल देसाई हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

Rahul Gadkar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोल्हापूर जिल्हा दौऱ्याचा आज पहिलाच दिवस असून कोल्हापुरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांची साथ सोडलेले के.पी.पाटील आणि ए.वाय पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं पवारांची भेट घेतली. समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचा आणखी एक नेता पवार गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई याचे चिरंजीव आहेत. ते राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राहुल देसाई यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एकत्रित भेट घेतली असल्याची माहिती आहे.

राधानगरीची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी दोन्ही नेत्यांशी सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. घाटगेनंतर देसाई हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे के पी पाटील, ए वाय पाटील यांच्यानंतर आता राहुल देसाई हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

आज सकाळी माजी आमदार के.पी पाटीलआणि त्याचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्हीही 'मेहुणे-पाहुणे' राधानगरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यासाठी त्यांनी 'फिल्डिंग' लावल्याची माहिती आहे.

'राधानगरी'साठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून प्रचंड चुरस असल्याचे चित्र आहे. यात आणखी राहुल देसाई यांची भर पडली आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिलेले समरजीत घाटगे शरद पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर भाजपमधील दुसरे नेते राहुल देसाई हे लवकरच 'तुतारी'फुंकणार असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT