MLA Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Monsoon Session : पुसेगाव, नेरमधील एमआयडीसीचे शिक्के उठवा... शशिकांत शिंदे यांची लक्षवेधी

Shashikant Shinde आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘सन १९९२-९३ मध्ये शासनाने संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या शेतजमिनी संपादित केल्या आहेत.

Umesh Bambare-Patil

-ऋषिकेश पवार

Khatav News : खटाव तालुक्यातील पुसेगाव आणि नेर येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केल्या गेल्या असून, त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसीचे शिक्के उठविण्याची मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिवेशनात केली.

विधान परिषदेत याबाबत लक्षवेधी मांडताना आमदार शिंदे Shashikant Shinde म्हणाले, ‘‘सन १९९२-९३ मध्ये शासनाने संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या शेतजमिनी संपादित केल्या आहेत. त्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे MIDC शिक्केही चढविले आहेत.

सध्या या क्षेत्रावर ऊस, कांदा, बटाटा, आले इत्यादी बागायती पिके हे शेतकरी घेत आहेत. मात्र, या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा व्यवहार करता येत नाही.

वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसी शिक्के काढून टाकण्याबाबत २०१८ पासून सातत्याने शासनाकडे पत्रव्यवहार करूनसुद्धा हे शिक्के काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.’’

हे शिक्के काढण्याबाबत शेतकऱ्यांनी १४ एप्रिल २०२३ रोजी पुन्हा लेखी पत्राद्वारे शासनाकडे मागणी केल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली.या भूसंपादनास शेतकऱ्यांचा पूर्वीपासूनच तीव्र विरोध असल्याने, तसेच शेतकऱ्यांनी या क्षेत्रात पाणीपुरवठ्याची सोय करून बागायती पिके केली असल्याने हे भूसंपादन रद्द करण्याची गरज असल्याचे मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT