Rajaram Sugar Factory Election:
Rajaram Sugar Factory Election: 
पश्चिम महाराष्ट्र

Rajaram Factory Election Result: राजाराम कारखाना निवडणूक निकाल; महाडिक-पाटील पॅनलची अटीतटीची लढत

सरकारनामा ब्युरो

Rajaram Sugar Factory Election : कोल्हापूरच्या राजकारणात कायमच केंद्रस्थानी राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज ता. २५) सकाळी ८ पासून सुरू झाली आहे. काही तासांमध्ये महादेवराव महाडिक यांची सत्ता कायम राहतेय की सतेज पाटील विजयाचा गुलाल उधळतात हे स्पष्ट होणार आहे.  मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे.

माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस दिसत आहे. पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर आहे. गट क्रमांक1 पहिल्या फेरी अखेर आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलच्या बेनाडे शालन बाबुराव यांना 2441 मते पडली असून भोसले किरण बाबासो यांना 2413 मते पडली आहेत. तर आमदार महाडिक पॅनेलच्या विजय भोसले यांना 3244 आणि संजय मगदूम यांना 3169 मते पडली आहेत. (Kolhapur Sugar Factory Elelction)

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना( Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result) निवडणुकीची मतमोजणी कोल्हापूरमधील रमणमळा येथील शासकीय गोदामात दोन टप्प्यात मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत १ ते २९ मतदान केंद्र व दुसऱ्या फेरीत ३० ते ५८ केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे. एकूण २९ टेबलांवर ही मतमोजणी होत आहे. प्रत्येक टेबलावर ४ अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण १५० कर्मचारी मतमोजणीसाठी उपलब्ध असणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT