Rajesh Kshirsagar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajesh Kshirsagar : शिंदेंच्या आमदाराची तिरकी चाल; थेट अतिक्रमण करणाऱ्यांना पाठिंबा

Kolhapur News : छोट्याशा टपरी पासून झालेला अतिक्रमण धारकांचा प्रवास हा स्वरूपात केल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याने अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त करण्यात आले.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजेच सीपीआर रुग्णालय हा सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड आहे. कोल्हापूर सांगली बेळगाव यासह सिंधुदुर्ग रत्नागिरीतील गोरगरिबांचा उपचार दाता म्हणून सीपीआर रुग्णालयाकडे पाहिले जाते. मात्र गेले अनेक वर्षांपासून सीपीआर परिसरात असलेले अतिक्रमणामुळे रुग्णालयाचा श्वास कोंडला होता.

वारंवार तक्रारी आणि नोटीसा देऊनही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण न काढल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या आदेशानुसार रविवारी सीपीआर मधील १४ हून अधिक अतिक्रमण धारकांविरोधात कारवाई करण्यात आली. छोट्याशा टपरी पासून झालेला अतिक्रमण धारकांचा प्रवास हा स्वरूपात केल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याने अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त करण्यात आले.

मात्र, याच अतिक्रमण धारकांच्या समर्थनार्थ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर धावून आले आहेत. इतकेच नव्हे तर थेट प्रशासनाला जाब विचारत असला प्रकार खपवून घेणार नसल्याचाही इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. अनेक रुग्णांची सीपीआर रुग्णालय जीवनवाहिनी आहे. याठिकाणी कोणताही गैरकारभार होता कामा नये याची खबरदारी सर्वांनी घेतलीच पाहिजे परंतु, फेरीवाल्यांवर अन्याय करून त्यांचा उघड्यावर पाडण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही. असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला.

आज सकाळीच सीपीआर प्रशासनाच्यावतीने पोलीस फौजफाट्यात सीपीआर मधील अतिक्रमण काढण्यास सुरवात करण्यात आली. यावेळी फेरीवाल्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना संपर्क करून होणाऱ्या अन्यायकारक कारवाईची माहिती दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ सीपीआर रुग्णालयास भेट देत कारवाईची माहिती घेतली.नियमानुसार प्रथम फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा मगच अतिक्रमणाची कारवाई करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी अधिष्ठाता सत्यवान मोरे यांना दिल्या.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, सीपीआर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब कुटुंबातील लोक किरकोळ व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत आहेत. अतिक्रमणाला आम्ही पाठीशी घालणार नाही. परंतु, अन्यायकारक कारवाई होत असेल तर न्यायाची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. याठिकाणी सन १९९५ पासून परवानाधारक फेरीवाले आहेत.

जे नियमित फाळा, लाईटबिल, इतर शासकीय कर भरतात. अतिक्रमण कारवाई करताना त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यानंतर अतिक्रमण कारवाई करणे गरजेचे असताना प्रशासनाने अचानक अतिक्रमणाची मोहीम हाती घेतल्याने फेरीवाले रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून सीपीआरची ख्याती आहे, असे असताना याठिकाणी कोणावर अन्याय होत असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. असंही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT