Rajesh Kshirsagar-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयश्री जाधवांच्या विजयाची जबाबदारी शिवसेनेची; कामाला लागा : ठाकरेंचा क्षीरसागरांना आदेश

महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीत राजेश क्षीरसागर यांची नाराजी दूर; क्षीसागर जयश्री जाधवांचा प्रचार करणार

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. तुम्ही कामाला लागा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी (ता. २१ मार्च) दुपारी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांना दिला. त्यामुळे उद्यापासून (ता. २२ मार्च) क्षीरसागर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा प्रचार करणार आहेत. आघाडीच्या नेत्याच्या मुंबईतील बैठकीत हे आदेश दिले. त्यामुळे क्षीरसागर यांची खदखद आता दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Rajesh Kshirsagar's displeasure removed; Chief Minister Thackeray orders to start work)

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी क्षीरसागर यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसला सोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे क्षीरसागर नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला गैरहजर राहून दाखवून दिली होती. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी २०२४ ला ही जागा शिवसेनेची असेल, असे जाहीर केले होते. मात्र, याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज त्यांना मुंबईत बोलविले होते.

सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले, ज्यावेळी आघाडी झाली, तेव्हा जेथे ज्या पक्षाचा आमदार आहे, तेथे तोच राहणार असल्याचे ठरले आहे. आघाडी होताना जे ठरले आहे, त्याच पद्धतीने जावे लागणार आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसची असली तरीही महाविकास आघाडी म्हणून ती लढविली जात आहे. त्यामुळे कामाला लागा.

बैठकीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि क्षीरसागर आज (ता. २१ मार्च) मुंबईत गेले होते. तेथे दुपारी झालेल्या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील, मंत्री उदय सामंत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT