Rajesh Latkar 2.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajesh Latkar News : काँग्रेसचा 'कोल्हापूर उत्तरे'त मोठा धमाका, महायुतीला तगडं आव्हान देणारा 'कार्यकर्ता' उतरवला मैदानात

Congress Assembly Election 2024 : काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे बालेकिल्ले मिळवण्यास सुरुवात केली आहे. सकाळी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला शिरोळ विधानसभा मतदारसंघ दहा वर्षांनी पुन्हा मिळवून उमेदवार जाहीर केला.

Rahul Gadkar

Kolhapur News : महाविकास आघाडीकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून नवा चेहरा आणि कार्यकर्ता कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली होती. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातील कार्यकर्ता शोधून उत्तरच्या मैदानात नवीन मोहरा उतरवला आहे. रस्त्यावरच्या कार्यकर्त्यालाच थेट संधी देत काँग्रेसनं (Congress) सस्पेन्स फोडला आहे.

गेल्या महिनाभरापासून ज्या उमेदवाराच्या नावासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील दादारांचे लक्ष लागून राहिलेल्या उमेदवाराचे नाव आज जाहीर करण्यात आले. माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या राजेश लाटकर यांच्याविरोधात शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे असण्याची शक्यता आहे. माजी आमदार विरोधात माजी नगरसेवक असा डाव काँग्रेसने टाकला असून मागील निवडणुकीत उद्योजक पॅटर्न यशस्वी झाला होता. आता काँग्रेसचा कार्यकर्ता पॅटर्न यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे बालेकिल्ले मिळवण्यास सुरुवात केली आहे. सकाळी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला शिरोळ विधानसभा मतदारसंघ दहा वर्षांनी पुन्हा मिळवून उमेदवार जाहीर केला.

काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, जागा वाटपात ही जागा काँग्रेसला सुटल्याने या ठिकाणी उमेदवार कोण असणार याबाबतची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर उमेदवाराचे नाव जाहीर झाले आहेत.

सामान्य कार्यकर्ता ते माजी स्थायी समिती सभापती असा प्रवास करणारे राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून शाहू महाराज छत्रपती यांना मताधिक्य लाटकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

वडील आणि आई हे पेशाने शिक्षक आहेत. राष्ट्रीय सेवा दलाचे काम करत असताना त्याचा छंद राजेश लाटकर यांना देखील होता. मात्र, सक्रिय राजकारणात त्यांनी प्रवेश केल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यात लाटकर यांची भूमिका होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची राजकीय कारकीर्द गाजली आहे. नगरसेवक ते स्थायी समिती सभापतीपर्यंत त्यांचा प्रवास राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत अशाच चेहऱ्याला संधी दिल्यानंतर कोल्हापूर उत्तरची जनता त्यांना स्वीकारणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT