Raju shetti
Raju shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टी नाराज; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला आहे. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, या अर्थसंकल्पावर माजी खासदार राजू शेट्टी (Raju shetti) चांगलेच संतापले.

त्यांनी या अर्थसंकल्पावर भाष्य करत शेतकऱ्यांविषयी अर्थसंकल्पात योग्य तरतूद नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर केला. यावर आपण समाधानी नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी म्हणाले, ''या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मी समाधानी नाही. या अर्थसंकल्पामध्ये रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींवर कसे नियंत्रण आणणार? याविषयी काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, तसेच शेतीशी निगडीत इतरही काही महत्वाचे प्रश्नावर यामध्ये काहीही उल्लेख नाही'', असे ते म्हणाले.

''या बरोबरच डेअरी आणि पोल्ट्री व्यवसायासाठी तोकडी तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आपण या अर्थसंकल्पावर समाधानी नाहीत. अर्थसंकल्पात सेंद्रीय शेतीचे तुणतुणे वाजवण्यात आले. पण रासायनिक खताच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण कसे मिळवायचे? याचा संपूर्ण बजेटमध्ये कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. ''

''एवढंच नाही तर डेअरी आणि पोल्ट्री व्यवसायासाठी तोकडी तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. शेतकऱ्यांबाबत बोलल तर या देशातील फक्त ४ टक्के लोकांनाच हमीभाव मिळतो. मग शेतीसाठी सरकार काय करतंय?', असा सवालही यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

''उसाचे वजन करणारे काट्याबाबतच्या निर्णयाबाबत काय झालं? प्रत्यक्ष डिजिटलायझेशन होणार का? तसेच कापूस उत्पादकांसाठी नवनवीन बियाणे आणि संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेच आहे. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्यासाठी कायदा करावा तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याने तुमचे समाधान झाले नाही का?'', असा सवाल करत राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पाबाबत बोलताना संताप व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT