Sadabhau Khot,  Raju Shetti Latest News
Sadabhau Khot, Raju Shetti Latest News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टींनी सदाभाऊंना भुरटा म्हणून फटकारले...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी रयत क्रांतीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून मला त्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही, अशा शब्दात शेट्टींनी सदाभाऊंच्या टिकेवरून त्यांना पत्युत्तन न देताच फटकारले आहे. आता शेट्टींच्या या टिकेवर खोतांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यामध्ये किमान हमी भाव या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शेट्टींनी माध्यमांशी संवाद साधला. (Sadabhau Khot, Raju Shetti Latest News)

राजू शेट्टी म्हणाले, किमान हमी भाव कायदा मंजूर करावा या मागणीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.आज देशातील बहुतांश खातेदार शेतकरी यांची उपजीविका शेतीवर आहे. आम्ही याबाबतचा मसुदा तयार केला आहे की, हमीभाव ठरल्याप्रमाणे कोणीही त्याच्या आत माल विकत घेणार नाही. तसेच, एमएसपी'ला हमीभाव मिळण्यासाठी ग्रामसभेचा ठराव करून त्याचे कागदपत्रे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे ट्रॉली नेणार असल्याचेही शेट्टी (Raju Shetti) यावेळी म्हणाले.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी आम्ही विधानसभेत 'एफआरपी'साठी आवाज उठवला. मात्,त्याचे श्रेय राजू शेट्टी घेत आहेत.अशी टीका त्यांनी शेट्टी यांच्यावर केली होती. यावर शेट्टी यांना प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही, अशी थेट शब्दात त्यांनी सदाभाऊंवर जळजळीत टीका केली.

ते पुढे आंदोलनाबाबत बोलताना म्हणाले की, शासन निर्णय झाला पाहिजे, नाहीतर पुन्हा आंदोलनाचा भडका उडू शकतो.सरकारने काही अवधी मागितला आहे. वजन-काटे येत्या काही महिन्यात डिजिटल होतील अशी आशा आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, सीमावादावर ते म्हणाले, ८६५ गावं आपले आहेत. हे सुप्रीम कोर्टात सांगायचे मात्र, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ही सरकारची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे.या गावांकडे दुर्लक्ष का झाले याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT