Bacchu Kadu-Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : बच्चू कडूंनी दिलेला आसूड राजू शेट्टींनी राज्य सरकारवरच ओढला

Swabhimani Shetkari Sanghatna : स्वाभिमानी शेतकरी संघटना हरामाचे पैसे मागत नाही, आमची मागणी चुकीची आहे, आकडेमोड चुकीचे आहे. हे दाखवून द्या.

Rahul Gadkar

kolhapur News : प्रहारचे आमदार बच्चू कडू हे माझे कनिष्ठ मित्र आहेत. केंद्र आणि राज्य सरकारवर, तसेच राज्यकर्त्यांच्या विरोधात उगारण्यासाठी त्यांनी माझ्याकडे आसूड सोपवला आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील सभेत राज्य सरकारवर आसूड ओढले. (Raju Shetti criticizes the state government)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेष यात्रा आजपासून (ता. १७ ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील सभेत राज्य सरकारवर आसूड ओढत राज्यकर्ते हे कारखानदारांचे दलाल असल्याची टीका केली. हे आंदोलन माझं नाही, स्वाभिमानी संघटनेचे नाही, तर समाजाचे आणि शेतकऱ्यांचे आंदोलन आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना हरामाचे पैसे मागत नाही, आमची मागणी चुकीची आहे, आकडेमोड चुकीचे आहे. हे दाखवून द्या. एफआरफी देऊन मागील वर्षी कारखान्याकडे ७०० रुपये राहिले आहेत. हे ७०० रुपये गेलं कुठे? त्या ७०० रुपयांमधील ३०० रुपयांमधून देणे भागवा, पण उरलेले ४०० शेतकऱ्यांना द्या. पैसे मिळाले नाहीतर गाठ स्वाभिमानी संघटनेशी आहे, असा इशाराच शेट्टी यांनी दिला.

कारखानदारांविरोधात लवकरच आंदोलन

शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याशिवाय उसाचे एक कांडंही तोडू देणार नाही. राज्यातील ३७ कारखान्यांच्या दारात जाऊन ढोल बडवणार आहे. १२०० कोटी काढून १५ लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. दसऱ्यापर्यंत कारखानदारांनी पैसे द्यावेत. येत्या ७ नोव्हेंबरला जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात ऊस परिषद होणार आहे. त्यात कारखानदारांविरोधात आंदोलन पुकारणार असल्याचा शेट्टी यांनी जाहीर केले.

शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निघालेली आत्मक्लेष यात्रा आज २७ किलोमीटरची असणार आहे. शिरोळच्या दत्त शुगर कारखानापासून सुरुवात झाली. या वेळी गावोगावी शेतकऱ्यांनी शेट्टी यांना उदंड प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी पायघड्या घालून या यात्रेचे स्वागत करण्यात आले. अनेक गावांत जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT