Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti Protest : मोठी बातमी ! राजू शेट्टींना घरच्या मैदानातच शेतकऱ्यांचा विरोध

Raju Shetti Kolhapur Protest News : शिरोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात

Rahul Gadkar

Kolhapur News: गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या स्वाभिमानीच्या ऊसदर आंदोलनाच्या कोंडीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत असताना राजू शेट्टी यांना त्यांच्याच घरच्या मैदानात आता शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागला आहे. ऊसदर आंदोलनावर तोडगा निघेल तेव्हा निघेल. मात्र, ऊसतोड लवकर घ्या, या मागणीसाठी शिरोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे.

शिरोळ तालुका शेतकरी कृती समिती यांच्या वतीने शिरोळ तहसीलदार यांना निवेदन देऊन उपोषणास सुुरुवात झाली आहे. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ तात्या डांगे यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळ येथे तहसीलदार सचिनकुमार हेळकर यांना निवेदन देऊन लवकर साखर कारखाने चालू करावेत, अशी मागणी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या आंदोलनामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे विहिरींना पाणी कमी आले आहे. यातच या आंदोलनामुळे ऊस गळीत हंगाम पुढे जात आहे. यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. शासन व कारखानदार यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

या आंदोलनामध्ये ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार, शेतमजूर, मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले होते. ऊस गळीत हंगाम पुढे जात असल्यामुळे ऊस वजनामध्ये घट होत आहे. राजू शेट्टी व सरकार यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी विनंती रामभाऊ तात्या डांगे यांनी केली. या वेळी बबन चौगुले, बाबासाहेब वनकोरे, केंदबा कांबळे, शिवाजीराव देशमुख, भरमु बदामे, तुकाराम चिगरे, भरत निर्मळे, तसेच समस्त कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनात शेतकरी नाहीत- शेट्टी

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आज सुरू असलेल्या आंदोलनातील हे ऊस उत्पादक शेतकरी नाहीत. ते गुरुदत्त कारखान्यातील कर्मचारी आणि ऊसतोड मजूर आहेत. त्यांची ही मागणी रास्त आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. केवळ कारखानदारांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्याही घरासमोर आंदोलन करावे," अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT