Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti Lok Sabha Election News : राजू शेट्टींच्या अडचणीत वाढ, ठाकरेंनी जाहीर केली सत्यजित पाटलांची उमेदवारी

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha Election : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीला फाट्यावर मारत 'एकला चलो'ची भूमिका घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने शेट्टी यांच्या अडचणीत वाढ केली आहे. शिवसैनिकांच्या दबावानंतर ठाकरे गटाने स्वतंत्रपणे महाविकास आघाडीचा Mahavikas Aghadi Cnadidate उमेदवार म्हणून माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Shetkari Sanghatana) या लोकसभेत पुन्हा एकदा धक्का मिळण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा यावर आपली भूमिका ठाम ठेवली होती. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेट्टी यांनी आपल्यासोबत येऊन मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव शेट्टी यांच्यासमोर ठेवला होता. आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) डोळ्यासमोर ठेवून मशाल चिन्ह घराघरात पोचवण्यासंदर्भात ठाकरे गटाची ही चाल होती. Satyajit patil hatkanangale lok sabha candidate of Shivsena UBT

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेट्टी यांनी त्याला नकार दिला. शिवाय शिवसैनिकांनी देखील उपरा उमेदवार नको निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या अशी भूमिका ठाकरे यांच्यासमोर मांडली होती. दरम्यान माजी आमदार सुजित मिनचेकर माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर (Satyajit Patil Sarudkar) यांच्या नावाची चाचणी करण्यात आली होती. अखेर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

वंचित बहुजन आघाडीकडून ही डीसी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर आता ठाकरे गटाने ही उमेदवार दिल्यानंतर अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT