Swabhimani Protest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Protest: 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाचा एसटी महामंडळाला फटका; सहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न बुडाले

Rahul Gadkar

Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला देखील बसला आहे. आज दिवसभरात 152 बस फेऱ्या रद्द झाल्याने जवळपास सहा लाखांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान कोल्हापूर एस टी महामंडळाचे झाले आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सांगली, इचलकरंजी, पुणे, मुंबई, सोलापूरसह अन्य मार्गावरील बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

गुरुवारी सकाळपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा पुलावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे. सकाळी 11 वाजता या आंदोलनला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत आंदोलन सुरूच आहे. कारखानदारांकडून मागणी मान्य होत नसल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हे रस्त्यावर ठाण मांडले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील दोन्ही बाजूस जवळपास सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. महामार्ग रोखल्याने जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कोल्हापूर ते सांगली रोडवर देखील वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळते. या परिस्थितीत एसटी महामंडळाचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक, छत्रपती संभाजीनगर या आगारातून सुटणाऱ्या जवळपास 152 बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. वाहतूक कोंडी प्रचंड झाल्याने एसटी आगारातच थांबून असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाला जवळपास सहा लाखांपेक्षा जास्त आर्थिक फटका बसला आहे.

दरम्यान, आज सकाळी कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर, इचलकरंजी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या आंदोलनामुळे त्रास करावा लागला. स्थानकातून सुटल्यानंतर रस्त्यामध्येच अडकल्याने जवळपास सहा ते सात तास प्रवासी एसटीमध्येच बसून आहेत. जर आंदोलनाचा तोडगा निघाला नाही तर वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. शिवाय अन्य प्रवाशांनी तावडे हॉटेल ते सांगली फाटा पर्यंत चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT