Raju Shetty sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetty Latest News : राजू शेट्टींचे एकला चलोरे; लोकसभेच्या सहा जागा लढवणार, मतदारसंघही ठरले!

Swabhimani Farmers Association : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमाणी शेतकरी संघटनेने तयारी सुरु केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Raju Shetti News : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमाणी शेतकरी संघटनेने तयारी सुरु केली आहे. स्वाभिमानी सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना राजू शेट्टी म्हणाले राज्यात सहकार व अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार सुरु आहे. ED चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा, फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यामध्ये माझी सुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा. मात्र, भाजपमध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका, असा टोलाही शेट्टी यांनी भापजला (BJP) लगावला.

तसेच यावेळी सर्वांची ईडी चौकशी करा. माझ्या चौकशीचा विचार असेल तर त्यासाठी देखील मी तयार आहे, असेही राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी नमूद केले. तसेच राज्यभरात स्वाभिमानी सहा ठिकाणी लोकसभेची निवडणुक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणत्याही पक्षाची युती करणार नाही असेही शेट्टी यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष कोणत्याही पक्षासमवेत युती करणार नाही. स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये मी स्वतः हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी, बुलडाणा (Buldhana) या जागा लढणार आहे. या सगळ्या ठिकाणी सक्षम उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्यकर्ते व राजकारण्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते आर्थिक संकटात असताना राज्यकर्त्यांकडून कोणतीही मदत किंवा विचारपूस शेतकऱ्यांची केली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता या राज्यकर्त्यांच्या विरोधात शेतकरी आवाज उठवेल, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT