Eknath Shinde, Raju Shetty Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetty : शेतकऱ्यांची थकबाकी द्या अन्यथा... ; राजू शेट्टी यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

CM Eknath Shinde : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Rahul Gadkar

Kolhapur Politcal News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (16 फेब्रुवारी) कोल्हापूरमध्ये येत आहेत. तत्पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करण्याचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांची थकबाकी मिळावी, यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. आता यावर सरकार कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या वर्षीची 100 रुपयांची थकबाकी (Sugarcane farmers dues) आहे. ही थकबाकी देण्यासंदर्भात सरकारने पावले उचलावीत अन्यथा मुख्यमंत्र्याचे कोल्हापुरात उद्या (16 फेब्रुवारी) काळे झेंडे दाखवून स्वागत करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला आहे.

ऊस बिलासाठी 23 नोव्हेंबर 2023 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sangatana) शिरोली पुलावर चक्का जाम केले होते. गतवर्षी तुटलेल्या उसाचे थकीत बिल 100 रुपये द्यावेत, तसेच ज्या साखर कारखान्यांनी (Sugar Factory) तीन हजारांच्या वर दिला आहे, त्यांनी 50 रुपये द्यावेत, असा लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यस्थी करून साखर कारखाने पैसे देतील, असे आश्वासन दिले होते. दोन महिने होत आले तरीही अनेकांनी प्रस्ताव दाखल केला नाही. केवळ आठ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. तसेच काही साखर कारखान्यांनी बिले देत नाही सांगत नकार घंटा वाजवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा शब्द मान्य करून आम्ही आंदोलन स्थगित केले होते. पण मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही कारखानदार बिले देता येत नाही असे सांगत असतील तर हा मुख्यमंत्र्यांचा उपमर्द आहे. मागणी करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी बैठक देखील घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी तातडीने दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या थकबाकीचे पैसे द्यावेत अन्यथा कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT