Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे राज्यातील मंत्र्यांच्या अडचणी वाढणार

सरकारनामा ब्यूरो

Raju Shetti News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उसाच्या 'एफआरपी'वरून आक्रमक झालेत. 25 नोव्हेंबरला राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेट्टींनी दिलाय. राज्य सरकारने तात्काळ यावर निर्णय घ्यावा, अन्यथा उद्यापासून राज्यातील मंत्र्यांना अडवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू केलंय. मात्र याकडे राज्य सरकारने (State Govt) लक्ष दिले नसल्याचा आरोप स्वाभिमानीकडून करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झालेत. स्वाभिमानीने पुकारलेल्या ऊसतोड बंद आंदोलनाला राज्यात प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी उसाची वाहतूक करणारी वाहनेही थांबवण्यात आली आहेत.

''उसाच्या एफआरपीच्या (FRP) प्रश्नावर मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री दखल घेत नाहीत. केंद्र सरकार अणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यावे, तसेच ऊसतोड मजुरांसाठी असलेली मुकादम व्यवस्था नष्ट करावी'', अशी मागणी शेट्टींनी केली आहे.

तोडणी वाहतुकीचा खर्च भरमसाट करणाऱ्या कारखान्यांचे ऑडिट करा, उसाचं वजन करणारे काटे दुरुस्त करा, त्यावर सरकारचं नियंत्रण आणायला हवं, मात्र सरकार हे का करत नाही?, असा सवाल शेट्टींनी केला. दरम्यान, उसाच्या एफआरपीच्या प्रश्नावर सरकार काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT