Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde News
Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmadnagar Politics : नगर भाजपमध्ये राजकारण तापले; विखे-शिंदे वाद विकोपाला?

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar BJP News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये वाद सुरु आहे.

भाजपच्या वतीने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज (ता. २४) अहमदनगर शहरात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरत सिंह रावत व पर्यटन विभागाचे अध्यक्ष विनोद गोटिया यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

या वेळी भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील दक्षिण भगाचे पक्षाचे सर्व आमदार पदाधिाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र, विधानपरषदेतील आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. गेल्या काही दिवसांपासून राम शिंदे आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यात दरी वाढत आहे.

राम शिंदे यांनी दक्षिण जिल्ह्यातून खासदारकी लढवण्याची इच्छा प्रकट केली होती. तेव्हापासून शिंदे-विखे गटामध्ये दरी वाढत असल्याची चर्चा आहे. जामखेड कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विखे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मदत केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.

त्यावेळी राम शिंदे यांनी सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर चांगलीच टीका केली होती. आज महाजनसंपर्क अभियानाला केंद्रीय पथक आले असतानाही शिंदे यांची कार्यक्रमाला दांडी मारणे हा चर्चेचा विषय ठरला. शिंदे हे मागील फडवणीस सरकारच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्याकडे तब्बल सात विभागांच्या मंत्रिपदाचा कारभार होता. मात्र, त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने कार्यक्रमाला दांडी मारणे यावरून भाजपमधील अंतर्गत कलह समोर आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT