Raghuveer Khedkar gave the biography of Kantabai Satarkar as a gift to Ramdas Athavale.
Raghuveer Khedkar gave the biography of Kantabai Satarkar as a gift to Ramdas Athavale. Ananad Gaikwad
पश्चिम महाराष्ट्र

कांताबाई सातारकरांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी रामदास आठवले करणार प्रयत्न

आनंद गायकवाड

संगमनेर ( अहमदनगर ) : कोविडमुळे प्रसिद्ध तमाशा कलावंत खेडकर परिवारातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रघुवीर खेडकर यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संगमनेरातील त्यांच्या निवासस्थानी आज दुपारी भेट दिली. त्याप्रसंगी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Ramdas Athavale will try to get posthumous Padma award to Kantabai Satarkar

या प्रसंगी रामदास आठवले म्हणाले, दिवंगत कांताबाई सातारकरांनी अवघं जीवन तमाशा कलेसाठी वाहीलं. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका तमाशा सम्राज्ञीला मुकला आहे. त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यासाठी समाज कल्याण व सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.

ते म्हणाले, तमाशा ही महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली तमाशा या लोककलेतील अस्सल कला जीवंत ठेवणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये कांताबाई सातारकर व खेडकर कुटूंबीयांचा मोठा वाटा आहे. मात्र त्यांच्या कलेचे शासनदरबारी म्हणावे असे चीज झाले नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. तमाशा ही कला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असल्याने या कलाकारांना मदत मिळावी अशी आपली भुमिका आहे.

पुढे आठवले म्हणाले, कोविडमुळे या कलाकारांची रोजीरोटी बंद झाली आहे. कोविडनंतर उपासमारीने त्यांचा मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारने त्यांना अडीच तीन हजार नाही तर किमान 25 हजारापर्यंत आर्थिक देण्याची आवश्यकता आहे. तसेच राज्यातील छोटे मोठे उद्योजक व व्यावसायिकांनी अशा कलाकारांना मदत करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपल्या मासिक मानधनातून 40 कलाकारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत केली आहे. त्यानंतरही अनेकांना यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राच्यावतीने शक्य ती मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, पवार यांची काही वर्षांपासून जलसंधारण विभागाची ईडी चौकशी सुरु असल्याने मुद्दाम चौकशी होते या आरोपात तथ्य नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उत्तर प्रदेशातील लखमीपूरची घटना दुर्दैवी असून, या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी रघुवीर खेडकर यांनी त्यांना डॉ. संतोष खेडलेकर लिखित कांताबाई सातारकर हे पुस्तक भेट म्हणून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT