Ramdas Athawale 1 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramdas Athawale : भाजपच्या जखमेवर मित्र आठवलेंनी मीठ चोळलं; म्हणाले, 'सुधीरभाऊंना मंत्री करायलाच पाहिजे होतं'

RPI party Union Minister Ramdas Athawale Satara BJP Sudhir Mungantiwar : आरपीआय पक्ष अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सातारा दौऱ्यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री करायला पाहिजे असे म्हणत भाजपला डिवचलं.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : महायुतीमधील भारतीय रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला चांगलचं डिवचलं आहे.

"भाजपचे आमदार सुधीर मुनंगटीवार यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे होते. पण तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. पण आता महायुती सरकारमध्ये एक मंत्रिपद शिल्लक राहिल्याने तिथे दलिता मतांचा विचार करावा, आणि आमच्या पक्षाचा मंत्री करा", अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

भारतीय रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांश संवाद साधला. महायुतीमध्ये दलित मतांचा विचार करावा, ही त्यांची जुनी मागणी पुन्हा रेटताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलल्यावरून भाजपला डिवचलं आहे.

लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो, असा माझ्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याचा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला (BJP) चांगलाचं डिवचलं. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. पण खरतर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री करायला हवं होते. पण आता एकच मंत्रिपद राहिल्याने दलित मतांचा विचार करायला पाहिजे. त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा मंत्री करा, अशी मागणी केली.

मंत्री आठवले यांनी मुंबईत राज्यातील आरपीआय पक्षाचे नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत आगामी येऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीकडून सन्मानाने विचार न झाल्यास बंडखोरीचा सल्ला दिला. केंद्रीय मंत्री आठवले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावरून भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

'झटका' असो वा 'हलाल'

भाजप मंत्री नीतेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटण विका, असा मुद्दा मांडला आहे. यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्याचा शैलीत उत्तर दिलं आहे. 'झटका' असो वा 'हलाल' आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. झटक्याने करा अगर पटक्याने करा. पण नीतेश राणे यांनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नका, असा सल्ला देखील मंत्री आठवले यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT