Balasaheb Patil, Ramraje Naik Nimbalkar
Balasaheb Patil, Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रामराजे, बाळासाहेब पाटील भाजपच्या नेत्यांना चुचकारणार...

Umesh Bambare-Patil

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना व भाजप यांनी आपापल्या परीने निवडणुक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. पण जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होऊन त्यामध्ये कोणाकोणाला सामावून घ्यायचे याविषयी अद्यान निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी रणनिती ठरवत नाहीत, तोपर्यंत या तीन पक्षांच्या नेत्यांच्या उड्या बिनकामाच्या ठरणार आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सध्या अंतिम मतदार यादी करण्याचे काम विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुरू आहे. या संदर्भात प्रसिध्द झालेल्या कच्च्या यादीवर दाखल हरकती व आक्षेपांवर सुनावणी होऊन आता आक्षेपांवर काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. यामध्ये सर्वात लक्षवेधी आहे ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पाणी पुरवठा संस्थेतील ठरावा पात्र राहणार की अपात्र ठरणार हा विषय महत्वाचा ठरणार आहे.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षांसह शिवसेना, काँग्रेस यावेळेस जिल्हा बँकेत त्यांच्या विचारांचे एक दोन संचालक असावेत, अशी भूमिका घेतली आहे. पण राष्ट्रवादीकडून अद्याप यापैकी कोणालाही तसा शब्द दिलेला नाही. यावेळेस जिल्हा बँकेची निवडणूक ही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता पालकमंत्री कोणत्या पक्षाला जिल्हा बँकेत सामावून घेणार याची उत्सुकता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीन जागांची मागणी केली आहे.

यामध्ये त्यांना गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा हा त्यांचा मतदारसंघ, तसेच एक महिला राखीव व दुसरी ओबीसींच्या जागेचा समावेश आहे. तर दुसरीकडे बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जिल्हा बँकेतील ताकद लक्षात घेता त्यांना सोबत घेऊनच जिल्हा बँकेची निवडणूक लढण्याची रणनिती राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे सातारच्या दोन्ही राजांना सामावून घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे.

तर काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीत एकत्र असल्याने त्यांच्याही नेत्यांना जिल्हा बँकेत स्थान हवे आहे. त्यासाठी शिवसेनेकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, तसेच काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण राष्ट्रवादीकडून अद्याप कोणाशीही यासंदर्भात चर्चा केलेली नाही. त्यामुळे आगामी आठवड्यात अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यावरच राष्ट्रवादी आपली रणनिती ठरविण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT