Raju Shetti, Uddhav Thackeray
Raju Shetti, Uddhav Thackeray  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : राजू शेट्टींना झटका तर ठाकरेंना बळ; पंढरपूरमधील 'हा' नेता हाती बांधणार शिवबंधन

सरकारनामा ब्यूरो

Ranjit Bagal Resign News : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गट, मनसे, शिंदे गट अशा सर्वच राजकीय पक्षात इन्कमिंग व आऊटगोईंगला उधाण आले आहे. याचाच फटका आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील बसला आहे. स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बागल यांचा राजीनामा हा माजी खासदार व शेतकरी नेते राजू (Raju Shetti) शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चळवळीतला आक्रमक चेहरा म्हणून रणजित बागल (Ranjit Bagal ) यांची ओळख आहे. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनं, मोर्चा यांद्वारे आवाज उठविला होता. मात्र, आता बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

रणजित बागल यांनी राजीनामा देताना काय म्हणाले?

बागल राजीनामा पत्रात म्हणाले, आदरणीयसाहेब ,मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेले सात ते आठ वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यानंतर 2020 आली आपण मला स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता अशी महत्वपूर्ण जबाबदारी दिली. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आपण दिलेली संधी म्हणजे कधीही न फिटणारे उपकार आहेत.

परंतू, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या गलिच्छ राजकीय परिस्थितीने मन अस्वस्थ झाले. बदलत्या राजकीय परिस्थितीत काही निर्णय घ्यावे लागतील. यासाठी मी आपल्या पक्षाच्या व संघटनेच्या राज्य प्रवकतेपदाचा व प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्रात नमुद केलं आहे.

ठाकरे गटाला मिळणार ताकद

रणजित बागल यांनी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकल्यानंतर बागल हे आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. रणजित बागल हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधणार शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे. बागल यांनी जर ठाकरे गटात प्रवेश केला तर पंढरपूर तालुक्यात पक्षाला मोठी ताकद मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT