Solapur 07 May : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बनावट नोटांचे वाटप केले आहे, असा खळबळजनक आरोप माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी केला होता.
त्यावर निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले असून गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे माझा विजय निश्चित आहे. उत्तम जानकर हे रंग बदलणारे गिरगिट असून त्यांनी केलेल्या बनावट नोटा वाटपचा आरोप खोटा आहे, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचे वाटप करण्यात आले आहे. हे पैसे बनावट आहेत. राज्यातील लुटलेला पैसा हे भाजपवाले आता वाटत आहेत.
यांनी वाटलेल्या नोट्या बनावट असून दुकानदारही घेत नाहीत. जवळपास २५ कोटी रुपये त्यांनी माळशिरस तालुक्यात वाटला आहे, असा आरोप जानकर यांनी केला होता. त्याला निंबाळकर यांनी उत्तर दिले असून जानकर हे रंग बदलणारे गिरगिट आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामामुळे माझा विषय निश्चित आहे. मोहिते पाटील यांनी केलेले आरोप म्हणजे ‘नाचता येईना; अंगण वाकडे’ असा प्रकार आहे, असा टोला भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अकलूजमधील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उत्तम जानकर हे रंग बदलणारे सरडा असून त्यांनी केलेल्या बनावट नोटांच्या आरोपांचे खंडन केले आहे. मोहिते पाटील यांना आपला पराजय दिसत असल्यानेच ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत, अशी टीकाही नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
बसपच्या जानकर यांचाही आरोप
दरम्यान, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार स्वरूप जानकर यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात मतांची खरेदी सुरू आहे. एक मत एक हजार ते पाच रुपयांना विकत घेतले जात आहे. माण विधानसभा मतदारसंघात सोमवारी रात्री अक्षरशः धुमाकूळ सुरू होता, असा आरोप बसपच्या जानकर यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.