Ranjitsinh Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील-उद्धव ठाकरे भेटीचे कारण आले पुढे; निकटतर्वीयांनी दिली ‘ही’ माहिती...

Mohite Patil-Thackeray Visit : रणजितसिंह मोहिते पाटील हे आज मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले. मातोश्रीवर या दोन नेत्यांमध्ये कौटुंबीक चर्चाही झाली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 01 February : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज (ता. 01 फेब्रुवारी) राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगली आहे. मात्र, मोहिते पाटील-उद्धव ठाकरे भेटीचे कारण पुढे आले आहे.

मोहिते पाटील यांच्या निकटवर्तीयाने या भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil ) यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह यांचा विवाह शिवांशिका सरनाईक यांच्याशी येत्या 08 मार्च रोजी अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे होणार आहे. मोहिते पाटील यांचे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे विश्वतेजसिंह यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आमदार मोहिते पाटील हे सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत. यात भेटीगाठीमागे कुठलाही राजकीय संदर्भ नाही.

त्याच अनुषंगाने रणजितसिंह मोहिते पाटील हे आज मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले. मातोश्रीवर या दोन नेत्यांमध्ये कौटुंबीक चर्चाही झाली. एकेमकांची ख्याली खुशाली, विचारपूस झाली. या भेटीवेळी कुठल्याही स्वरूपाची राजकीय चर्चा झालेली नाही, असे मोहिते पाटील यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कौटुंबीक कारणासाठी होणाऱ्या या भेटीगाठीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यात कोणत्याही प्रकाराचे तथ्य नाही. माध्यमांतून येणाऱ्या बातम्या हा सुतावरून स्वर्ग काढण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रियाही मोहिते पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

भाजपकडून कौतुक

भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत विशेष कामगिरी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पत्र पाठवून अभिनंदन करण्यात आले आहे. एकीकडे भाजपतून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, यासाठी त्यांच्या विरोधकांकडून आक्रमक भूमिका मांडली जात आहे. मात्र, विरोधानंतरही मोहिते पाटील यांनी भाजपचे काम करत एक हजार सदस्यांची नोंदणी करत पक्षसंघटना बळकट करण्याचे काम केले आहे. त्याबाबत खुद्द बावनकुळेंनी रणजितसिंहांचे कौतुक केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT