पंढरपूर : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल सुरु आहेत. त्यातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने गोरगरिबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सरकारने महागाई कमी करुन सर्वसामान्याला दिलासा द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१ मार्च) पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला आघाडीच्या वतीने वाखरी (ता. पंढरपूर Pandharpur) येथे जागरण गोंधळ व रास्ता रोको आंदोलन करून सरकारने केलेल्या भाववाढीचा निषेध केला. (Rasta Roko Andolan of NCP Mahila Aghadi against inflation)
सुमारे दोन तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनामुळे पंढरपूर-पुणे मार्गावर वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. केंद्र सरकारने गॅस दर कमी करावेत; अन्यथा यापुढच्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा राजेश्री ताड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
मोदी सरकार आल्यापासून देशात आणि राज्यात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे. त्यातच आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गोरगरीबांच्या घरातील गॅस बंद झाले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे यांनी दिला.
वाढत्या महागाईमुळे गोरगरीबांच्या तोंडचा घास पळाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने महागाई कमी करावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेऊन घरगुती सिलिंडरच्या दरात कपात करावी; अन्यथा राज्यभर सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही म्हेत्रे यांनी दिली.
आंदोलनामध्ये प्रा.कविता म्हेत्रे, जिल्हाध्यक्षा सूवर्णा शिवपूरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष वर्षाराणी शिंदे, नवाजबी इनामदार, सारिका ढोबळे, पुष्पा गुंजेकर, मनीषा भोसले, माधुरी बुरांडे, वैशाली लिंगे, नसीमा तांबोळी, राणी कवडे, राणी कवडे, संदीप मांडवे, सुधीर भोसले, स्वप्नील जगताप, श्रीकांत शिंदे, राजेंद्र ता़ड, मारुती जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.