Pratibha Gaikawad, Rayat Shikshan Sanstha
Pratibha Gaikawad, Rayat Shikshan Sanstha sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'रयत'च्या सहसचिवांचा राजीनामा; पाचवडला बदली

सरकारनामा ब्युरो

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या सध्या साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्यरत होत्या. आज त्यांची पाचवड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची बदली करण्यात आली आहे. आपण वैयक्तिक कारणांमुळे सहसचिव पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव व सध्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्यरत असलेल्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी 'रयत'च्या सहसचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेत एकच खळबळ उडाली आहे. डॉ. गायकवाड यांची पाचवड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी पाचवडचे प्राचार्य बाळासाहेब कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांनी आपला पदाचा कार्यभार स्वीकारला. तसेच प्राचार्या डॉ. गायकवाड या ही पाचवड महाविद्यालयात रूजू झाल्या आहेत. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचे स्वायत्त महाविद्यालय आहे. आपण वैयक्तिक कारणांमुळे सहसचिव पदाचा राजीनामा दिल्याचे डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT