Mahesh Shinde, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खरे खंडणी बहाद्दर कामगार नेतेच : महेश शिंदेंचा शशीकांत शिंदेंवर घाणाघात...

उद्योजकांना Entrepreneurs जर तुम्ही पैसे Money काढण्याचे ठिकाण समजत असाल, तर महेश शिंदे Mahesh Shinde इथून पुढे तुम्हाला शंभर टक्के आडवा असेल, असा इशारा त्यांनी दिला.

Umesh Bambare-Patil

सातारा ः सातारा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) खरे खंडणी बहाद्दर येथील कामगार नेते, माजी आमदार आहेत. त्यांनी स्वतःच्या युनियन करून उद्योजकांना धमकावत असतात. असे असताना विनाकारण साताऱ्याच्या गादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे आता थांबवायचं आहे, असा इशारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेले कोरेगावचे आमदार महेश शिंदे आज साताऱ्यात दाखल झाले. साताऱ्यात आल्यावर ते थोडे आक्रमक झाले होते. ते म्हणाले, सातारा एमआयडीसीतील खरे खंडणी बहाद्दर इथले कामगार नेते, माजी आमदार आहेत. त्यांनी स्वतःच्या युनियन करून उद्योजकांना धमकावत असतात.

असे असताना विनाकारण साताऱ्याच्या गादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे आता थांबवायचं आहे. ज्यांनी आजपर्यंत युनियन टाकून उद्योग धंदे बुडवायचा प्रयत्न केला. त्या उद्योजकांना आम्ही ताकद देऊन उद्योग धंदे वाढवणार आहोत. उद्योजकांना जर तुम्ही पैसे काढण्याचे ठिकाण समजत असाल, तर महेश शिंदे इथून पुढे तुम्हाला शंभर टक्के आडवा असेल, असा इशारा त्यांनी शशिकांत शिंदेंचा नामोल्लेख टाळून केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT