Vishal Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil Rebel : सांगलीच्या रक्तात बंड; विशाल पाटलांनी काँग्रेस अन् पैलवानाचंही टेन्शन वाढवलं

Sangli Lok Sabha Constituency : उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर सांगलीत विशाल पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल आहे. पाटलांच्या या भूमिकेचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Sangli Political News : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करून सांगली लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीसाठी त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर सोशल मीडियावर विशाल पाटलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते सांगलीला बंडाची परंपरा असल्याचे सांगून गड राखण्यासाठी मेहनत घेण्यास पाटलांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यांच्या विधानाने त्यांनी सांगलीतून महाविकास आघाडी आणि भाजपसमोर स्वबळावर आव्हान निर्माण करण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. परिणामी येथील लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले.

विशाल पाटील Vishal Patil यांनी बंडखोरी करताच सोशल मीडियावर बंडखोरी सांगलीची परंपरा अशा आशयाचे व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या शक्तिप्रदर्शन कार्यक्रमात विशाल पाटील यांनी सांगलीला बंडाची परंपरा असल्याचे म्हटले होते. वसंतदादांनी बंड केले नसते तर आपल्याला स्वतंत्रपणे कार्यक्रम घेता आले नसते. सांगलीला बंडाची परंपरा आहे. बंड आपल्या रक्तात आहे. आणि हे बंड यशस्वी करण्याची जाबाबदारी सर्वांची आहे, असे वक्तव्य विशाल पाटलांनी केले होते. आता त्यांचा तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशाल पाटलांच्या बंडामुळे महाविकास आघाडीत MVA नाराजीचे वातावरण आहे. या बंडखोरीमुळे भाजपच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना विशाल पाटील माघार घेतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. आता सांगलीतून आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या महिन्यापासून सांगली Sangli लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत खल सुरू आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सुरू असलेल्या या वादात मात्र शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil दोन हात दूरच राहिल्याचे दिसतात. पाटील यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध केल्याचेही काँग्रेसचे नेते उघडपणे सांगतात. त्यांनी सांगलीसाठी दोन वेळा दिल्ली वाऱ्याही केल्या, मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. परिणामी विशाल पाटलांनी बंडाचे निशाण हाती घेतले. विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करून थेट जयंत पाटलांनाच आव्हान दिल्याचे बोलले जाते.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT