Jarandeshwar Sugar Factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jarandeshwar Sugar Factory : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना दिलासा ; काय आहे प्रकरण ?

सरकारनामा ब्यूरो

Jarandeshwar Sakhar Karkhana: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सी.ए. योगेश बगरेचा यांना प्रत्येकी दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला. तसेच, त्यांना देश सोडून न जाण्याच्या आणि पुराव्याशी छेडछाड न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्हा बँकेने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ८२६ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. मात्र, कारखान्याच्या संचालकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निकटवर्तीयांना कवडीमोल दराने कारखाना विकल्याचा दावा न्यायालयाने केला होता. २०१० साली कारखाना लिलावात काढण्यात आला. गुरू कमोडिटी प्रा. लि. या कंपनीने अवघ्या ६५ कोटी ७४ लाखात कारखाना खरेदी केला. त्यावेळी कारखान्यावर ७८.९ कोटींचं कर्ज होतं.

दुसरीकडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही कारखान्याला सुमारे ९६ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. पण कारखान्याची मूळ किंमत कमी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात या बँकांनी कर्ज का दिले. या प्रकरणी 'ईडी'ने कारखान्यावर कारवाई करत संचालकांवरही गुन्हा दाखल केला.

त्यावर जामीन मिळण्यासाठी कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेचा यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने तिघांनाही प्रत्येकी दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करत त्यांची सुटका केली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT