Police inspector in nude dance case
Police inspector in nude dance case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

न्यूड डान्स प्रकरणी पोलिस इन्स्पेक्टरची बदली

सरकारनामा ब्युरो

नागपूर : नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या शहराची ओळख सांस्कृतिक व सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून आहे. उमरेड तालुक्यातील भुगाव येथे लावणीच्या कार्यक्रमात अश्लील नृत्याचा कार्यक्रम झाला होता. या प्रकरणी एका पोलिस पोलिस इन्स्पेक्टरची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. (Replacement of police inspector in nude dance case)

उमरेड तालुक्यातील भुगाव येथील ब्राम्हणी न्यूड डान्स प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला चार आयोजकांवर गुन्हे दाखल केले. मात्र व्हायरल व्हिडीओ याच लावणी कार्यक्रमातील आहे का, याबाबत पोलिसांना खात्री नव्हती. आज आणखी एकाला अटक करण्यात आली असून आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे. लावणीच्या नावावर अश्लील नृत्य झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी शिवारात अश्लील नृत्य प्रकरणात चंद्रकांत मांढरे, सुरज नागपुरे आणि अनिल दमके यांना अटक करण्यात आली. तिघांनी ऍलेक्स डान्स शो आयोजित केला होता. कोरोना नियमांचं उल्लंघन, बेकायदेशीरपणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे आणि अश्लील नृत्य करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्लील नृत्य करणाऱ्या नागपुरातील ऍलेक्स डान्स गृपच्या तरुण-तरुणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या न्यूड डान्स प्रकरणात आता उमरेडचे पोलिस इन्स्पेक्टर यशवंत सोलसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. उमरेड पोलिस ठाण्याचा चार्ज प्रमोद भोंगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावर नागपूर जिल्ह्यात उलट सुलट चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT