Solapur ZP Reservation  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP Reservation : बळीराम साठेंचे स्वप्न भंगले; उमेश पाटलांना पुन्हा संधी, कुर्डूत शिंदे कुटुंबातील उमेदवार कोण?

Reservation announcement News : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांची समीकरणं बदलली आहेत. बळीराम साठे यांचा गट ओबीसी राखीव झाल्याने त्यांचे स्वप्नभंग, तर उमेश पाटील यांच्या नरखेड गटात उत्सुकता वाढली आहे.

Vijaykumar Dudhale
  1. सोलापूर जिल्ह्यातील ६८ गटांचे आरक्षण जाहीर झाले असून अनेक नेत्यांची राजकीय समीकरणे बदलली आहेत; काहींचे स्वप्न भंगले तर काहींना नवी संधी मिळाली.

  2. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे यांचा नान्नज-वडाळा गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांचे निवडणूक लढविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

  3. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नरखेड गटात सर्वसाधारण आरक्षण राहिल्याने तीव्र चुरस अपेक्षित असून, अनेक गटांमध्ये स्थानिक राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Solapur, 13 October : मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गटांचे (मतदारसंघ) आरक्षण आज जाहीर झाले असून सोलापूर जिल्ह्यातील 68 गटांत आरक्षण सोडतीत अनेकांचे स्वप्न भंगले आहे, तर अनुकूल आरक्षण पडलेल्या अनेकांना आतापासून जिल्हा परिषद सदस्य झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचा नान्नज-वडाळा गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांचे शेवटची निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा नरखेड गट सर्वसाधारण राहिल्याने सर्वाधिक चुरस पाहायला मिळू शकते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार आज जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितींच्या गणांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यात अनेक बड्या नेत्यांचे जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे.

माढा तालुक्यातील कुर्डू जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारणसाठी खुला राहिला आहे. तो माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे शिंदे कुटुंबातील कोण कुर्डूमधून निवडणूक लढविणार याची उत्सुकता आहे. तसेच, शिवाजी सावंत यांचा पारंपारिक मानेगाव गटही खुला राहिला आहे, त्यामुळे शिवाजी सावंत यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत हे या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकतात.

सोलापूर जिल्ह्यातील तालुका, गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

करमाळा तालुका

पांडे : सर्वसाधारण महिला

वीट : सर्वसाधारण महिला

कोर्टी : सर्वसाधारण महिला

चिखलठाण : सर्वसाधारण

वांगी एक : सर्वसाधारण महिला

केम : ओबीसी महिला

....................

माढा तालुका

भोसरे : सर्वसाधारण महिला

मानेगाव : सर्वसाधारण

उपळाई बुद्रुक : ओबीसी महिला

कुर्डू : सर्वसाधारण

टेंभुर्णी : ओबीसी महिला

बेंबळे : सर्वसाधारण महिला

मोडनिंब : सर्वसाधारण महिला

...........................

बार्शी तालुका

उपळाई ठोंगे : ओबीसी

पांगरी : सर्वसाधारण महिला

उपळे दुमाला : ओबीसी महिला

पानगाव : सर्वसाधारण

मालवंडी : सर्वसाधारण महिला

शेळगाव (आर) : सर्वसाधारण महिला

उत्तर सोलापूर

नान्नज : ओबीसी

बीबी दारफळ : सर्वसाधारण

कोंडी : सर्वसाधारण

...........................................

मोहोळ

आष्टी : सर्वसाधारण

नरखेड : सर्वसाधारण

कामती बुद्रूक : सर्वसाधारण महिला

पोखरापूर : ओबीसी

पेनूर : सर्वसाधारण

कुरुल : सर्वसाधारण

...............................

पंढरपूर तालुका

करकंब : सर्वसाधारण

भोसे : सर्वसाधारण महिला

रोपळे : अनुसूचित जाती महिला

गोपाळपूर : सर्वसाधारण महिला

वाखरी : सर्वसाधारण महिला

भाळवणी : अनुसूचित जाती महिला

टाकळी : अनुसूचित जाती

कासेगाव : ओबीसी

माळशिरस तालुका

दहिगाव : अनुसूचित जाती

मांडवे : सर्वसाधारण

फोंडशिरस : सर्वसाधारण

संग्रामनगर : ओबीसी महिला

माळीनगर : अनुसूचित जाती

बोरगाव : अनुसूचित जाती

वेळापूर : अनुसूचित जाती महिला

निमगाव : ओबीसी महिला

पिलीव : सर्वसाधारण

.........................................

सांगोला तालुका

महूद बुद्रुक : ओबीसी

एखतपूर : ओबीसी महिला

जवळा : सर्वसाधारण

कडलास : सर्वसाधारण महिला

चोपडी : सर्वसाधारण

कोळा : सर्वसाधारण

घेरडी : ओबीसी महिला

..........................................

मंगळवेढा तालुका

संत दामाजीनगर : ओबीसी

हुलजंती : सर्वसाधारण महिला

लक्ष्मी दहिवडी : अनुसूचित जाती महिला

भोसे : सर्वसाधारण

.................................

दक्षिण सोलापूर

बोरामणी : सर्वसाधारण

कुंभारी : ओबीसी महिला

वळसंग : ओबीसी

हत्तूर : सर्वसाधारण महिला

मंद्रूप : सर्वसाधारण महिला

भंडार कवठे : अनुसूचित जमाती महिला

.................................

अक्कलकोट तालुका

चपळगाव : सर्वसाधारण महिला

वागदरी : ओबीसी

जेऊर : अनुसुचित जाती

मंगरूळ : अनुसूचित जाती महिला

नागणसूर : सर्वसाधारण

सलगर : ओबीसी

प्रश्न 1 : सोलापूर जिल्हा परिषदेत किती गटांचे आरक्षण जाहीर झाले?
एकूण ६८ गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे.

प्रश्न 2 : कोणत्या गटात माजी अध्यक्ष बळीराम साठे प्रभावित झाले?
नान्नज-वडाळा गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकत नाही.

प्रश्न 3 : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील कोणत्या गटातून लढण्याची शक्यता आहे?
नरखेड गट सर्वसाधारण राहिल्याने, त्या गटातून त्यांची चुरस पाहायला मिळू शकते.

प्रश्न 4 : या आरक्षण सोडतीचा उद्देश काय आहे?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यासाठीची तयारी म्हणून ही आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT