Solapur Politics :
Solapur Politics :  
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : राजकारण तापलं! तांबेवरील कारवाईनंतर पदाधिकाऱ्याचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो

Solapur Politics : कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबेंवरील (Satyejeet Tambe) कारवाई नंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष आणि तांबे यांचे समर्थक नितीन शिवशरण (Nitin Shivsharan) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपण कायम तांबे यांच्या पाठिशी राहणार असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

नाशिक (nashik) पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Election) बंडखोरी करत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसने उमेदवारी देऊनही तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सोलापुरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. पण त्यांच्यावरील कारवाईनंतर त्यांच्या समर्थनार्थ राज्यातील विविध भागातून पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे समोर आले आहे.

तांबेंवरील कारवाईनंतर तांबे समर्थक नितीन शिवशरण यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेश कमिटीकडे पाठवला आहे. तरुणांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्यजीत तांबेंसारखा नेता हा महाराष्ट्राच्या (maharashtra) सभागृहात असणे गरजेचे आहे. सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याची त्यांची भूमिका, त्यांची कामाची पध्दत, ही युवा नेतृत्वासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तांबे यांच्या समर्थनार्थ मी राजीनामा दिला आहे. अशी प्रतिक्रिया शिवशरण यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT