Congress  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Congress : निष्ठावंतांच्या साथ सोडण्याने सातारा काँग्रेस पुरती घायाळ!

Satara Congress Taluka President Resignation : सातारा तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाबरोबरच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे, त्यामुळे सातारा काँग्रेसला धक्का मानला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 09 February : लोकसभा निवडणुकीत एक नंबरची कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्या धक्क्यातून काँग्रेस पक्ष अद्याप बाहेर आलेला नाही, तोच निष्ठावंतांच्या पक्ष सोडण्याने सातारा काँग्रेस पुरती घायाळ झाली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला (Congress) चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना अनपेक्षितपणे पक्षाला नामुष्कीजनक पराभवाचे तोंड पाहावे लागले. राज्यातील सर्वच भागात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही काँग्रेसची हाराकिरी दिसून आली आहे. सातारा जिल्ह्यात एकमेव जागा हातची गेली आहे.

विधानसभेला सातारा (Satara) जिल्ह्यातून कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव आमदार निवडून यायचे. मात्र, त्यांचाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे, त्यामुळे साताऱ्यातून काँग्रेसचा एकही आमदार नसताना पदाधिकारीही आता पक्षाची साथ सोडत असल्याचे दिसून येत आहे. निष्ठावंत कार्यकर्तेच पक्ष सोडत असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.

सातारा तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाबरोबरच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे, त्यामुळे सातारा काँग्रेसला धक्का मानला जात आहे.

संदीप चव्हाण यांनी तालुकाध्यक्ष म्हणून पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये विशेष सहभाग नोंदवला होता. विशेषत: डिजिटल सभासद नोंदणीमध्ये त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. चव्हाण यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबरोबरच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

संदीप चव्हाण यांनी जिल्हा काँग्रेस भवनाच्या नूतनीकरणाच्या कामात लक्ष घालून ते काम मार्गी लावले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्यावर विश्वास टाकून जी जबाबदारी दिली होती, ती यथाशक्ती पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही चव्हाण यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. संदीप चव्हाण यांच्यासारखा संवेदनशील पदाधिकारी पक्षातून बाहेर जाणे हा जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT