Radhakrishna Vikhe Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmadnagar Politics : सत्तारांच्या तक्रारीची दखल; महसूलमंत्री विखेंच्या कार्यालयाची 12 सप्टेंबरला सुनावणी

Radhakrishna Vikhe Patil News : सामाजिक कार्यकर्ते शेख शाकिर अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

(राजेंद्र त्रिमुखे)

Ahmednagar News : अहमदनगर येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू केल्याप्रकरणी लोकायुक्त यांनी त्याची गांभीर्य दखल घेऊन सुनावणी ठेवली आहे. या बाबत माहिती अधिकार करकर्ते शेख शाकिर अब्दुल सत्तार यांनी लोकयुक्तांकडे तक्रार केली होती.

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महसूल विभागाकरिता मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांना शासकीय कार्यालय उपलब्ध आहे. असे असताना त्यांनी अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा नियोजन भवन या इमारतीमधील जिल्हाधिकारी यांच्या जुन्या कार्यालयाच्या ठिकाणी खाजगी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.

या बाबत सामाजिक कार्यकर्ते शेख शाकिर अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांची लोकायुक्त विद्यासागर मुरलीधर कानडे, यांनी दखल घेऊन 12 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवलेली आहे. नुतन जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर रोडवरील शासकीय विश्रामगृह जवळ बांधण्यात आल्यामुळे जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपविभागी दंडाधिकारी नगर भाग यांच्या कार्यालय स्थलांतर करण्यात आलेले.

मात्र, विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांना खाजगी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याबाबत तोंडी निर्देश दिले. त्यावरून 16 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा नियोजन समितीने काढलेल्या आदेशावर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पालकमंत्री विखे यांनी त्यास मान्यता देऊन कार्यालय सुरू केले आहे, असे शेख यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही मंत्र्यांना त्यांच्या विभागाकरिता शासकीय कार्यालय मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागामार्फत उपलब्ध करून दिले जात असताना पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी जनसंपर्क कार्यालय करिता जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद नाही. पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी बैठकांसाठी सभागृह व कार्यालय नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामधे उपलब्ध आहे.

तरी विखे यांनी खाजगी जनसंपर्क कार्यालय सुरू करताना आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून सदरचे कार्यालय सुरू केलेले आहे, असा आरोप शेख यांनी केला आहे. तसेच त्याला विद्युत व इतर सुविधा शासकीय विभागामार्फत पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. सदरचा खर्च त्यांच्याकडून वसूल करुन विखे पाटील यांच्याविरुद्ध शिस्तभागाच्या कारवाईची मागणी शेख शाकिर अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT