R.R. Patil Rohit Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सेनापतीला दाखवून द्यायचं होतं की मावळ्यांनी गड राखलेला आहे...

Nagar Panchayat Election Results : "निवडणुकीनंतर माझा बाप आठवेल"

सरकारनामा ब्युरो

कवठे महाकांळ : सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ नगरपंचायतीवर (Nagar Panchayat Election Results) राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील (R.R.Patil) यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. कवठे महांकाळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या शेतकरी विकास आघाडी ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी जोर लावूनही इथे भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

या निकालामुळे रोहित पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार एन्ट्री केली आहे. तसेच "निवडणुकीनंतर माझा बाप आठवेल" असा त्यांनी प्रचारादरम्यान दिलेला शब्द खरा केला आहे. निवडणूक काळात आई आमदार सुमन पाटील तंदुरुस्त नसल्याने प्रचाराची सर्व जबाबदारी रोहित यांच्या खांद्यावर होती. तसेच निवडणुकीत सर्वजण विरुद्ध रोहित पाटील अशी स्थिती होती. मात्र या आव्हानानंतरही त्यांनी एकहाती मैदान मारले आहे.

या निकालावर प्रतिक्रिया देताना रोहित पाटील म्हणाले, प्रचारावेळी विरोधकांनी वडील हा शब्दप्रयोग करण्याऐवजी बाप शब्द वापरला. त्यांचाच धागा पकडून मी विरोधकांना "निवडणुकीनंतर बाप आठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. मला आज आबांची आठवण येतं आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आज राष्ट्रवादीला बहुमत मिळालं, आबांचं स्वप्न पूर्ण झालं. सेनापतीला दाखवून द्यायचं होतं की मावळ्यांनी गड राखलेला आहे.

कवठे महांकाळ शहरात निवडणूक लढवत असताना शहर कसं असायला हवं, पुढच्या २५ ते ३० वर्षांच्या काळात शहर कसं हवं याचं व्हिजन लोकांसमोर ठेवलं, त्यामुळे लोकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याचंही रोहित पाटील यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली , सुमनताईंच्या अनुपस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण जो विश्वास दाखवला त्याबद्दलही रोहित यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT