Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar : क्रिकेटनंतर कुस्तीचं मैदानही रोहित पवारांनी मारलं, महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Maharashtra Kustigir Parishad Election : सध्या महाराष्ट्रात राज्य कुस्तीगीर परिषदेचे दोन गट पडले असल्याचा पाहायला मिळत आहे. दोन्ही गट आपलीच कुस्ती परिषद ही अधिकृत असल्याचं सांगतानाच महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Sudesh Mitkar

Summary :

  1. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ शेअर करत विरोधकांवर जोरदार टीका केली होती.

  2. या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

  3. एकाच वेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून, रोहित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. रोहित पवार सातत्याने विरोधकांवर गंभीर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. सध्याही महाराष्ट्रभर हा चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे रोहित पवार विरोधकांशी शाब्दिक राजकीय कुस्ती खेळत असतानाच त्यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. (Rohit Pawar elected unopposed as Maharashtra State Wrestling Council president while remaining at the center of political controversy involving viral rummy video of agriculture minister)

सध्या महाराष्ट्रात राज्य कुस्तीगीर परिषदेचे दोन गट पडले असल्याचा पाहायला मिळत आहे. दोन्ही गट आपलीच कुस्ती परिषद ही अधिकृत असल्याचं सांगत आहेत. अशातच त्यातील एका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद ही राज्यातील सर्वांत जुनी संघटना आहे. दोन वर्षांपूर्वी संघटनेची मान्यता आणि राजकारणाच्या घेऱ्यात अडकली. तसेच संघटनेची निवडणूक आणि वैधतेबाबतही प्रश्न निर्माण झाले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ खरा की महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद वैध याचा वाद थेट कोर्टात पोचला होता. अखेर रविवारी (ता. 27) पुण्यात वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या बोर्डाची निवडणूक झाली. यामध्ये आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आयपीएलच्या धर्तीवर सलग तीन वेळा एमपीएल यशस्वीपणे भरवून राज्याच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. तसेच गेल्यावर्षी अहिल्यानगर येथे महाराष्ट्र क्रिकेट संघाच्यामाध्यमातून भरवण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत वाद झाल्याने आणि या स्पर्धेच्या एकूणच वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली होती.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेली चाळीस वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांनी चालणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक पैलवानांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. शरद पवार यांच्या याचे हेच काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता त्यांचेच नातू आमदार रोहित पवार यांच्यावर आली आहे.

याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘‘कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील मैदानी खेळ असून या कुस्तीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी आणि राज्यातील गुणी व होतकरु पैलवानांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पवार साहेबांनी या संघटनेत केलेलं काम माझ्यापुढं दीपस्तंभाप्रमाणे असून यापुढंही आम्हाला सर्वांनाच त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. या निवडणुकीत बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघांचे मनापासून आभार!’’

FAQs :

1. रोहित पवार कोणत्या पदावर निवडून आले आहेत?
→ महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

2. रम्मी व्हिडिओ प्रकरण काय आहे?
→ रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला, ज्यावरून राजकीय खळबळ उडाली.

3. रोहित पवार सध्या कोणत्या पक्षात आहेत?
→ राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे आमदार आहेत.

4. विरोधकांवर रोहित पवार सातत्याने टीका का करत आहेत?
→ सत्ताधाऱ्यांवरील भ्रष्टाचार, निष्क्रीयता, आणि जनहित मुद्द्यांवर टीका करताना ते चर्चेत आहेत.

5. कुस्ती परिषद निवडणूक बिनविरोध का झाली?
→ इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज न भरल्यामुळे रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT