Gopichand Padalkar-Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : ‘शरणू हांडे प्रकरणाचे रोहित पवार मास्टरमाईंड; कार्यकर्त्यांत वाद कशाला लावता? मी बारामतीत कोठे येऊ सांगा?’

Solapur kidnapping Case : माझ्या गाडीवर सोलापूरमध्ये 2021 मध्ये हल्ला झाला होता. त्यात हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यात यावी. तसेच माझ्यावर झालेल्या हल्ल्यात रोहित पवार यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 08 August : शरणू हांडे याच्या अपहरणप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. पडळकरांनी रोहित पवारांचा फोटो दाखवत शरणू हांडे अपहरण प्रकरणाचा ‘मास्टर माईंड’ असल्याचा आरोप केला आहे. तसेच, रोहित पवार तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद कशाला लावता?, त्यापेक्षा मला सांगा मी बारामतीमध्ये येतो. रोहित पवार यांनी मला वेळ आणि ठिकाण सांगावं, मी तिथे येतो, असे आव्हान दिले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे कार्यकर्ते शरणू हांडे याचे सोलापूर शहरातून सायंकाळी पाचच्या सुमारास अपहरण झाले होते. मात्र, पाेलिसांनी सतर्कता दाखवून कर्नाटकातील झळकीजवळ अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून हांडे याची सुटका केली. हाडे याच्या पायावर कोयत्याने वार केले आहेत, त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

हांडे याची गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले, पोलिसांच्या सतर्कतेमुळे शरणू हांडे वाचला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली, गाडी भाड्याने कुठून घेतली, त्याचे लोकेशन पोलिसांनी घेतले, त्यामुळे शरणू सुखरूप मिळाला.

माझ्या गाडीवर 2021 मध्ये अमित सुरवसे याने मोठा दगड टाकला होता. मात्र, विरोधकांनी आरोप केला की मी पब्लिसिटी स्टंट केला आहे. अमित सुरवसे याच्या छातीवर शरद पवारांचा फोटो आहे, त्याने माझ्या गाडीवर टाकला आहे. विरोधक हे महाराष्ट्राबाबत गळा काढत आहेत की, आमदारांच्या सुरक्षेबाबत काहीतरी करा. त्यावेळी 307 कलम दाखल करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही, असेही पडळकर यांनी नमूद केले.

माझ्यावर हल्ला झाल्यानंतर अमित सुरवसे याने शरद पवारांचे आशीर्वाद घेतानाचा हा फोटो आहे. माझ्या गाडीवर दगदफेक केल्यानंतरचा हा आशीर्वाद घेतानाचा हा फोटो आहे. रोहित पवारांचा फोटो दाखवत 'हा यांचा मास्टर माईंड आहे' असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

ते म्हणाले, दुसरा फोटो आहे, जो महादेव देवकते त्याच्या छातीवर शरद पवारांचा फोटो आहे. या दगडफेक प्रकरणानंतर महादेव देवकते याने माझी भेट घेतली आणि मला सांगितले की दगडफेक होण्याआधी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी या महादेव देवकतेचा जबाब घेतला पाहिजे.

शरणू हाडेची मी भेट घेतली, त्यावेळी त्याने मला सांगितले की, त्याला अमानुषपणे मारण्याचा प्लॅन होता. गाडीत असताना अमित सुरवसे याने एक व्हिडीओ कॉल केला होता. व्हिडीओ कॉलवर त्याला माफी मागायला सांगितली होती. कोणीतरी यामागे असल्याशिवाय हे प्रकरण होऊ शकत नाही.

माझ्या गाडीवर 2021 मध्ये झालेल्या हल्ल्याच्या प्रकारणाची फेरचौकशी झाली पाहिजे. त्यात जे आरोपी आहेत, त्यांना अटक केली पाहिजे. त्याचबरोबर माझ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये रोहित पवार यांना आरोपी करावे, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली.

अपहरण प्रकरणातही आरोपीने रोहित पवार यांचे नाव घेतले. त्यांना व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. रोहित पवार यांनी शरणू हांडेला माफी मागायला सांगितली होती, असे त्याने मला सांगितले. त्यामुळे रोहित पवार तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद कशाला लावता, त्यापेक्षा मला सांगा मी बारामतीमध्ये येतो. रोहित पवार यांनी मला वेळ आणि ठिकाण सांगावं, मी तिथे येतो, असे आव्हान पडळकर यांनी रोहित पवारांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT