अहमदनगर - मुंबईतील विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज 2022-23चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीकडून स्तुती सुमने तर भाजपकडून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी अर्थसंकल्पाची स्तुती करत भाजप नेत्यांवर टीका करणारे ट्विट केले आहे. ( Rohit Pawar said that the five points in the state budget will be a problem for the opposition )
रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडथळ्याची शर्यत पार करताना राज्यातील ग्रामीण व शहरी भागाचा समतोल राखण्याचं काम बजेटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार! या अर्थसंकल्पामध्ये विकासाची पंचसूत्री मांडल्याने विरोधकांची पंचाईत होईल, पण त्याला नाईलाज आहे.
त्यांनी पुढे म्हंटले आहे की, महापुरुषांचा स्वाभिमान राखणारे आणि विकासाला गती देणारे हे बजेट आहे. त्यामुळे सरकारवर केवळ टीका करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे थकलेला राज्याचा हक्काचा जीएसटीचा निधी मिळण्यासाठी जरी सहकार्य केले तरी राज्यावर त्यांचे मोठे उपकार होतील, असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला.
अहमदनगर जिल्ह्यावर विशेष कृपा
अहमदनगर जिल्ह्यातील निम्मे आमदार एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तसेच काँग्रेसचे दोन व शिवसेनेचे एक आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रबल्य आहे. हे प्राबल्य वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यात भरीव निधी दिला आहे. जिल्ह्यातील रस्ते, रेल्वे, कृषी, वैद्यकीय व औद्योगिक विकासासाठी या अर्थसंकल्पात भरीव निधी देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.