Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'रोहित पवार, तुम्ही काहीही करा...जिंकणार तर भाजपच!

भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी काल ( रविवारी ) भाजप प्रचाराची सांगता सभा घेतली.

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. यात कर्जत नगर पंचायतीचाही समावेश आहे. काल ( रविवारी ) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी आज भाजप प्रचाराची सांगता सभा घेतली. यात त्यांनी रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर जोरदार टीका केली. 'Rohit Pawar, whatever you do ... then only BJP candidate will be elected'

या सभेला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सुवेंद्र गांधी, आंबादास पिसाळ, बाळासाहेब महाडिक, अशोक खेडकर, सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी, वैभव शहा आदी उपस्थित होते.

राम शिंदे म्हणाले, कर्जत शहरातील राजकारण मागील 15 दिवसांत खालच्या पातळीवर आले आहे. भाजप शहराध्यक्षाच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज काढून घेण्यात आला. तेच भाजप शहराध्यक्ष आजही आमच्या बरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ज्या उमेदवारासाठी सायंकाळी चार वाजता सभा घेतली होती. तोच उमेदवार पाच वाजता राष्ट्रवादीच्या सभेत जाऊन त्यांना पाठिंबा देऊन आला. आता मतदानाला एकच दिवस बाकी आहे. आणखी एखादा गळाला लागतो का? हे ते शोधत आहेत. काही करा भाजपचे 9 उमेदवार निवडून येणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, पवार घराण्याचा वारसा सांगता आणि विरोधी पक्षाचा उमेदवार फोडता. याची लाज वाटायला हवी. जो शब्द दिला तो पाळला. कर्जतचा चेहरा मोहरा मागील 5 ते 7 वर्षांत बदलला. 2019ची निवडणूक एक अपघात होती. तुम्ही मी आंदोलन केलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडलं. आम्ही एवढे अपवित्र आहोत काय? अडीच वर्षांत आल्यापासून त्यांना कुसळही टोचू दिले नाहीत. दिवसभर आमच्या लोकांना कसा त्रास द्यायचा याचे नियोजन करता. जीवाची बाजी लावेल. गोरगरिबांची झोपडपट्टी उठू देणार नाही.

आमच्या विरोधात प्रचार करण्यासाठी गुजरात वरून हार्दिक पटेलला आणलं. हार्दिक पटेलला येथलं घंटा कळतं का? नगर पंचायतला गुजरात वरून माणसं आणली. जिल्हा परिषद निवडणुकीला केंद्रातून नेते आणतील. विधानसभेला जिओ बायडेन, बराक ओबामा, ब्लादिमीर पुतिन असे नेते येतील. माझ्या जवळ कारखाना नाही, बँक नाही तरीही मी निवडून येतो कसा हे त्यांना कळत नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

आमच्या विरोधात फळी निर्माण केली. शहरात भावी नगराध्यक्ष, नगरसेवकांचे बोर्ड लागू लागले आहेत. त्यांनी शहरात सर्वेक्षण केले. त्यांच्या खरं लक्षात आलं म्हणून त्यांनी आमच्याच मोरक्या नेला. आता त्याची काय अवस्था आहे. माझ्या नावावर कर्जतमध्ये गुंठाही नाही. घ्यायचाही नाही. कर्जतमध्ये सध्या कोणीही कोणाचा सातबारा उतारा काढून घेतेय. लोक दोन वर्षांपासून उशाला उतारे घेऊन झोपत आहेत. 21 तारखेला ओवाळून उतारा टाका. काळी बाहुली, एक लिंबू आलेल संकट घालविण्याचा एकच मंत्र म्हणजे मतदान. ते योग्य करा म्हणजे झालं. एकाचड एक पुढारी एकाच ठिकाणी गेले. मग त्यांनी म्हणावे भावी आमदार म्हणून दाखवावं. त्यांना जिल्हा परिषद, नगराध्यक्ष तर सोडाच नगरसेवकपदही मिळेणा, अशी टीका ही त्यांनी केली.

रोहित पवारांच्या आव्हानाला उत्तर

आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत राम शिंदे यांना विकासावर आमने सामने चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले होते. यावर राम शिंदे म्हणाले, समोर येऊन चर्चा करायला तुमच्याकडे काय आहे. दोन वर्षांत नुसती खोटी आश्वासने दिली. मी कधी खोटं बोललो नाही. आश्वासने दिली नाहीत पण कामे करून दाखविली. त्यांनी शहराबाहेर जमिनी घेतल्या म्हणून प्रशासकीय कार्यालये शहराच्या बाहेर नेली. मी असा विकास कधी केली नाही. शेवटी आपलं ते आपलंच असतं. भाजपमधील कोणीही जाणार नाही. कोणीही आता हलणार नाही. तिकडे गेलेले आता घेणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT