rohit patil

 

sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही ; रोहित पाटलांनी खडसावलं

'मला बालीश म्हणून ठरवायचं व माझ्यावरच विरोधकांनी बोलायचं, ही वेळ कवठेमहांकाळ शहरात नेत्यांवर आली आहे. माझ्या वडिलांची आठवण काढल्याशिवाय विरोधकांना झोप लागणार नाही,''

सरकारनामा ब्युरो

सांगली : नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. यानिमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीने भाजपवर (bjp) हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील (ncp leader rohit patil) यांनीही विरोधकांवर यावेळी टीकास्त्र सोडलं.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांनी रविवारी प्रचार सांगता सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘निवडणुकीच्या निकालावेळी तुम्हाला माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही,' असे रोहित पाटील (rohit patil)म्हणाले.

रोहित पाटील म्हणाले, ''अनेक जण मला म्हणतात ती तुम्ही जनतेच्या मनातील पॅनेलं उभं केलं आहे. सर्वसामान्यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे, राष्ट्रवादीला जनतेनं खांद्यावर घेतलं आहे. याचा निकाल १९ तारखेला आल्यानंतरच माझ्या आबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही,''

''मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत, हे माझ्या पुढे येऊन सांगावं,' असे रोहित पाटील म्हणाले.

''निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून केलेलं काम लोकांसमोर ठेवलं आणि पुढे काय करणार आहोत हे देखील सांगितले. मला विश्वास आहे ह्या भागातील सुज्ञ जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देऊन विजयी करेल,'' असा विश्वास रोहित पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

''मला बालीश म्हणून ठरवायचं व माझ्यावरच विरोधकांनी बोलायचं, ही वेळ कवठेमहांकाळ शहरात नेत्यांवर आली आहे. माझ्या वडिलांची आठवण काढल्याशिवाय विरोधकांना झोप लागणार नाही. निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनेल अनपेक्षित आहे. तसंच निकालसुद्धा अनपेक्षित लागणार आहे,' असा विश्वासही यावेळी रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT