PWD Contractor Andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : तिजोरीत खडखडाट : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कंत्राटदारांचे आंदोलन

Federation of State Contractors राज्‍य कंत्राटदार महासंघाच्‍यावतीने तीन दिवस राज्‍यव्‍यापी आंदोलन सुरु करण्‍यात आले आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सातारा जिल्‍ह्‍यातील विविध भागात शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी थकीत देणी मिळावीत या मागणीसाठी आंदोलन केले. तीन दिवस राज्‍यव्‍यापी लाक्षणिक साखळी उपोषण केले जाणार असून बांधकाम विभागाकडून येणे असलेली रक्कम न मिळाल्‍यास पुढील महिन्‍यापासून सर्व शासकीय कामे थांबविण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे.

राज्‍य कंत्राटदार महासंघाने तीन दिवस राज्‍यव्‍यापी आंदोलन सुरु केले आहे. याच आंदोलनात सहभाग नोंदविण्‍यासाठी सातारा Satara येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या PWD आवारात हे आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य राजू भोसले, बिल्‍डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्‍या सातारा शाखेचे सचीन देशमुख, ओमकार भंडारे, श्रीराज दिक्षीत, तुषार जोशी तसेच कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी, सभासद सहभागी झाले होते.

राज्‍य कंत्राटदार महासंघाच्‍यावतीने तीन दिवस राज्‍यव्‍यापी आंदोलन सुरु करण्‍यात आले आहे. याच आंदोलनात सहभाग नोंदविण्‍यासाठी सातारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या आवारात हे आंदोलन करण्‍यात आले. राज्‍यभरातील कंत्राटदारांना सुमारे ११ हजार कोटींची रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे.

याबाबत संघटनेच्‍यावतीने वारंवार शासनाशी संपर्क साधण्‍यात आला, मात्र त्‍यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. कामे करुनही रक्कम मिळत नसल्‍याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे याकडे लक्ष वेधण्‍यासाठी हे आंदोलन पुकारण्‍यात आले आहे.

सातारा येथील आंदोलनात हॉटमिक्‍स रोड कॉन्‍ट्रॅक्‍टर्स असोसिएशन, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, मजुर संस्‍थांचे पदाधिकारी, सदस्‍य सहभागी झाले होते. आंदोलनावेळी बिल देण्‍याची कार्यवाही तात्‍काळ करण्‍याच्‍या मागणीसाठी घोषणाबाजी करण्‍यात आली.

यावेळी संघटनेच्‍यावतीने पदाधिकाऱ्यांनी म्‍हणणे मांडले. यात त्‍यांनी जिल्‍हाभरातील कंत्राटदारांना देणे असणारी रक्कम तात्‍काळ देण्‍याची कार्यवाही करण्‍याची, यापुढील काळातील निविदा प्रक्रिया थांबविण्‍याची मागणी केली. मागणीनुसार कार्यवाही न झाल्‍यास पुढील महिन्‍यापासून शासकीय कामे बंद ठेवण्‍याचा इशारा यावेळी आंदोलक कंत्राटदारांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT