Bhagwanrao Gore Passes Away Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagwanrao Gore Passes Away: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वडिलांचे निधन

Jaykumar Gore father passed away:भगवानराव गोरे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी (ता. माण) येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

Mangesh Mahale

दहिवडी (सातारा) : ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (वय ७६) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सुरेखा, जावई, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे.

गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

भगवानराव गोरे हे माण तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष होते. हसतमुख व सर्वांशी आपलेपणाने वागणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वपरिचित होते.

भगवानराव गोरे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी (ता. माण) येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यविधी बोराटवाडी येथेच होणार असल्याचे त्यांच्या कुंटुबियांनी कळवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT