Subhash Deshmukh-Sachin Kalyanshetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DPC Metting : सचिन कल्याणशेट्टींनी सुभाष देशमुखांचे भाषण थांबवले अन्‌....

Subhash Deshmukh-Sachin Kalyanshetti : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत भाजप नेत्यांमधील स्पर्धा पुन्हा पहायला मिळाली. सचिन कल्याणशेट्टी यांनी सुभाष देशमुख यांचे भाषण थांबवत अभिनंदनाचा ठराव मांडला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 11 July : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सोलापूर जिल्हा नियोजन समितीची आज (११ जुलै) पहिलीच बैठक झाली. त्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधील ‘नोकझोक’ पहायला मिळाली. बैठकीच्या सुरवातीलाच भाजपचे दक्षिण सोलापूरचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे बोलत होते, त्या वेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देशमुख यांचे भाषण थांबवत मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पाडली. त्या बैठकीला जिल्ह्यातील बहुतांश आमदार, खासदार उपस्थित होते. दक्षिण सोलापूरचे भाजपचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख हे सुरुवातीलाच आपल्या मतदारसंघासह विविध प्रश्न मांडत होते.

आम्ही बैठकीत बोलतो, विविध विषय मांडतो. पण त्यावर प्रभावी अंमलबजावणी होत नाही, असे म्हणत सुभाष देशमुख यांनी भाषणाला सुरुवात केली होती. मात्र, तोच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सुभाष देशमुख यांना दोन मिनिटे थांबण्याची विनंती केली.

सोलापूर शहरातील ‘बी-२’ जमिनी ह्या महायुती सरकारने फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने तब्बल शंभर वर्षांपूर्वीपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो निर्णय घेतल्याबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठीच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांचे भाषण थांबवले. तत्पूर्वी सचिन कल्याणशेट्टी यांनी नियोजन समितीच्या बैठकीतच आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून बी-२ जमिनीबाबतची संपूर्ण माहिती घेतली.

आमदार कोठे यांच्याकडून माहिती घेऊन आमदार कल्याणशेट्टी तातडीने उठले आणि आमदार सुभाष देशमुख यांना थोडावेळ भाषण थांबविण्याची विनंती केली. सोलापुरातील बी २ जमिनीबाबत राज्य सरकारने अत्यंत स्वागतार्ह निर्णय घेतला आहे, असे सांगून कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT