Sadabhau Khot News : अमोल मिटकरी तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष सरदारांचा आहे. या सरदारांनी गावगाढ्यातील शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना लुटलेले आहे. यांची लुट नेस्तनाबुत व्हावी, त्यांच्या लुटीची माती व्हावी यासाठी मी दोन हजारांबरोबरच ५०० आणि १०० रुपयांची नोटही मागे घ्या, असे म्हटले आहे. अमोल मिटकरी तुमच्याकडे पोत्याने नोटा आहेत. सर्वसामान्य माणसांकडे नाहीत. नोटबंदीची भीती सर्वसामान्य शेतकऱ्यांना नसून दोन नंबर, काळ्या पैसेवाल्यांनाच जास्त आहे. त्यामुळेच तुमच्या पोटात गोळा आला आहे, अशी जोरदार टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांच्यावर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीचे रयत क्रांती संघटनेने स्वागत करुन ५०० आणि १०० रुपयांच्याही नोटा बंद करा, अशी मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी टीका केली. त्यावर कऱ्हाड (जि.सातारा) येथे बोलताना खोत Sadabhau Khot म्हणाले, मला सत्तेचे आणि भावी पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले नाहीत.
५०० आणि १०० रुपयांच्या नोटा प्रस्थापीत आणि शेतकऱ्यांचे खळं लुटणाऱ्याकडे आहेत. आता या नोटांचा उपयोग लाच म्हणून देणे आणि निवडणुकीत वाटण्यासाठी केला जातो. ५०० रुपयांची नोट मागे घ्यावी याची मागणी केल्यावर तुमच्या पोटात का कळा सुटाव्या कारण तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष सरदारांचा आहे. या सरदारांनी गावगाढ्यातील शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना लुटलेले आहे.
यांची लुट नेस्तनाबुत व्हावी, त्यांच्या लुटीची माती व्हावी यासाठी मी ५०० आणि १०० रुपयांची नोटही मागे घ्या असे म्हंटले आहे. आता ऑनलाइन पद्धतीने गुगल, फोन पे वरून होत आहेत. गावगाड्यातील शेतकरी ५० रुपये, दहा रुपयांच्या नोटेतही व्यवहार करतो नोटबंदीची भीती सर्वसामान्य शेतकऱ्यांना नसून दोन नंबर, काळ्या पैसेवाल्यांनाच जास्त आहे. पोत्याने नोटा अमोल मिटकरी तुमच्याकडे आहेत. सर्वसामान्य माणसांकडे नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.