Sadabhau Khot & Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'आभाळात वार करणाऱ्या गृहराज्यमंत्री देसाईंना जिल्ह्यात काय चाललंय हे माहितच नाही'

माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

सातारा : सातारा जिल्ह्यातील पळसावडे गावात दोन दिवसापूर्वी वनरक्षक दाम्पत्याला मारहाण कोल्या प्रकरणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सातारा अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे (Ajiit Bhoradhe) यांची आज (ता.21 जानेवारी) भेट घेतली व संबंधित मारहाण करणारा माजी सरपंच रामचंद्र जानकर याच्यावर कडक कारवाई करून त्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) लढविण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाईंवर (Shambhuraj Desai) या घटनेवरुन टीका केली आहे.

खोत म्हणाले, साताऱ्यात वनरक्षक महिलेला मारहाण करण्यात आलेली घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. याप्रकरणी मारहाण करणार गुन्हेगार जानकरवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, त्याने अशा अजून किती कार्यालयांना वेठीस धरले आहे का? व त् दबाव आणून काही कामे मिळवले का याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच, या गुन्ह्याचा निवाडा हा फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील असलेले गृह राज्यमंत्री देसाईं हे नेहमी आभाळात वार करतात पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यात काय चाललंय हे त्यांना माहीत नाही. जिल्ह्यात असे गुंड जर बिनधास्त फिरत असतील तर, या गुंडांना गृहराज्यमंत्री यांचे अभय आहे का? असा सवाल खोतांनी उपस्थित करत देसाईंना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, राज्यात अशा पद्धतीने कृत्य करणे म्हणजे राज्यात मोगलाई लागून गेली आहे का? अशा शब्दात त्यांनी देसाई व राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सुनावले आहे.

दरम्यान, माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नी यांनी महिला नवरक्षक सिंधू सानप (Sindhu Sanap) आणि त्यांच्या पतीलला मारहाण केली होती. जानकर हे स्थानिक वनसमितीचे सदस्य आहेत. त्यांना न विचारता वन मजूरांना इतर नेल्याचा राग आल्याने सानप यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. सानप यांच्या तक्रारीनंतर जानकर व त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT