Sangli News : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. त्यांनी कर्जमाफीवरून थेट शेतकऱ्यालाच सुनावल्याने आता महायुतीचे सरकार देखील अडचणीत आले आहे. यावरून सरकारला आता खुलासा करावा लागला आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याची माफी मागताना, कोकाटे यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे. एकीकडे कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीचे सरकार बॅकफूटवर गेले आहे. तर दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख तथा विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी कोकाटेंच्या कामकाजावर समाधान व्यक्त केलं आहे. तसेच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही भाष्य केलं आहे.
एका शेतकऱ्याने कर्जमाफी कधी होणार असा सवाल केल्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांनी, नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांनी ते भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघायची. पण कर्जमाफी झाल्यानंतर येणाऱ्या पैशांचं तुम्ही काय करता? पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून आता राज्याच जोरदार टीका सुरू झाली आहे.
याच मुद्द्यावर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. 'राज्याचे कृषिमंत्री ज्या पद्धतीने आज शेतकऱ्याच्या संबंधांमध्ये उद्गगार काढलेत ते योग्य नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कोकाटे यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो. ते अनेक वर्ष राजकारणात असून कृषिमंत्री झाल्यानंतर त्यांचे काम पाहिलं आहे. जे समाधानकारक असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
तसेच राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का? या प्रश्नावर त्यांनी, निश्चितपणे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, असे म्हणताना, शेतकऱ्यावर कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेलं आहे. तर सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं असल्याचा घरचा आहेरच त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी, शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील, तरच शेतमालाला चांगला भाव मिळेल, असेही म्हटलं आहे.
जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवल असं धोरण आखणार नाही. शेतकरी विरोधी कायदे हठवणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कर्जाचे पीकच येतच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत? याबाबत जाणकार मंडळी काय म्हणतात, हे देखील जाणून घ्यायला हवं. यासाठी एका परिषदेचे आयोजन सरकारने करावे, अशीही मागणी त्यांनी केलीय
आजपर्यंत शेतकऱ्यांची धोरणंही ही डायनिंग टेबलवरती चमच्याने शेतकऱ्याचा घास खाल्ला आणि पडले यांनी ठरवली. पण ज्यांचा चिखला मातीमध्ये हात होता त्यांना संधी देण्यात आली नाही. यामुळेच आज शेतकऱ्यांचा मसन वाटा झाला असून शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला आहे. याचाही कुठेतरी अभ्यास होणं गरजेचं असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.